corona1 
पुणे

पुरंदरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा धुमाकूळ, जेऊरमध्येही प्रवेश

किशोर कुदळे

वाल्हे (पुणे) : पुरंदर तालु्क्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव होऊ लागला आहे. आज जेजुरी येथे चार, तर जेऊर येथे एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात दुपारपर्यंत कोरोना रूग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाली. तालुक्यात रूग्ण संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला असून, रूग्ण संख्या 504 झाली असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली. 

पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याचशा गावांप्रमाणे जेऊरकरांनी देखील गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावामध्ये कोरोनाचा प्रवेश होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली होती. मात्र, आज सासवड येथे खासगी रूग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अखेर जेऊरदेखील कोरनाबाधितांच्य़ा यादीत आले.  

जेऊर- मांडकी या गावांनी गेल्या चार- पाच महिन्यांपासून गाव कोरोनामुक्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र, काल मांडकी आणि आज जेऊर या गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिक हवालदिल झाले आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्याने जेऊर येथील एक रूग्ण सासवड येथील खासगी रूग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून उपचार घेत आहे. काल त्यांचे कोरोना चाचणीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. आज त्याचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर तो रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समजले. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
जेऊर गावातील पहिला कोरोना रूग्ण आढळल्याने गावामध्ये निर्जुंतुकीकरण करण्याबरोबरच स्वच्छतेच्या आणि गावातील रूग्ण सर्वेक्षणाच्या सुचना आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला देण्यात आल्या. जेऊर गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून, जेऊर गावच्या हद्दीत येण्यास अथवा बाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचात कर्मचारी यांच्या माध्यमातून गावाचे सर्वेक्षण करून संबंधित रूग्णाच्या जवळच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच प्रतिक धुमाळ यांनी सांगितले.
    
दरम्यान, ग्रामस्थांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी. घाबरुन न जाता मास्क वापरावेत व श्वसनाचा त्रास, सर्दी, खोकला, ताप यापैकी काही लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय आरोग्य सेवेशी संपर्क साधावा, असे आवाहन वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे व पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT