Indian_Revenue 
पुणे

राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दस्त नोंदणीवर मुद्रांक शुल्कात तीन सवलतीचा गुरवार शेवटचा दिवस असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. नोंदणीसाठी झालेली गर्दी विचारात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली. राज्यभरात गुरुवारी (ता.31) दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 16 हजार 481 इतके दस्त नोंदविण्यात आले. त्यातून राज्य शासनाला 118 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नोंदणी खात्यामध्ये हा नवा विक्रम नोंदविला गेला आहे. 

बांधकाम क्षेत्राला चालना तसेच घरखरेदीदारांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 1 सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. या कालावधीत दस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होऊ नये, तसेच अधिकाधिक नागरिकांना दस्त नोंदविता यावी, यासाठी डिसेंबर महिन्यात शनिवारीसुध्दा दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्यात आली होती. 

शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी आठवडाभर नागरिकांची गर्दी होती. आज तीन टक्के सवलतीचा शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. 28 डिसेंबर रोजी राज्यात दिवसभरात 18 हजार 698 दस्त नोंदविले गेले त्यामधून राज्य शासनाला 131 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर दि.29 डिसेंबर रोजी राज्यात 20 हजार 878 दस्त नोंदविण्यात आले आणि राज्य शासनाला 186 कोटी रुपयांचा महसुल मिळाला. तर दि.30 डिसेंबर रोजी राज्यात 20 हजार 618 दस्त नोंदविण्यात आले त्यामधून 169 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

नववर्षापासून दोन टक्केच सवलत 
मुद्रांक शुल्कात तीन टक्‍क्‍यांची सवलत ही 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारकडून देण्यात आली होती. उद्या म्हणजे 1 जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात आता 2 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे शहरात तसेच प्रभाव क्षेत्रांतील गावांमध्ये तीन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस (LBT) असा चार टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तर ग्रामीण भागात दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस असे तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Railway NOC: रेल्वे ट्रॅकपासून ३० मीटरपर्यंत बांधकाम करायचंय? तर आधी रेल्वेकडून NOC घ्यावी लागणार, मुंबईत नवा नियम लागू

ICC World Cup 2027 New Formats: वन डे वर्ल्ड कप २०२७, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ नव्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार; ICC ची घोषणा

आई मुलाखत झालीये, सकाळी घरी येतो; रात्री फोनवर बोलला, पुण्याहून परतताना पहाटे अपघातात मृत्यू

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

'तू भारतासाठी भरपूर केलंस...'; गौतम गंभीरचा 'हिटमॅन' रोहित शर्माला मॅसेज, India vs England मालिका शेवटची? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT