Tamarind Jayram supekar
पुणे

चिंच फोडून बेरोजगारीवर मात; सुप्यात शेकडोंच्या हाताला मिळाले काम

शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला

जयराम सुपेकर

सुपे : कडक उन्हाळा. शेतातील कामे उरकत आल्यामुळे मजूरीची कामे कमी झाली. त्यात भरीसभर म्हणून कोरोना महामारीच्या साथीमुळे रोजगार थंडावला. तरी सुपे (ता.बारामती) परिसरात चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात चिंचेची मोठी बाजार पेठ म्हणून सुप्याची बाजारपेठ प्रसिद्ध झाली आहे. बारामती, दौंड व पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील सुपे गावाला परिसरातील २५-३० गावांतील लोकांची नेहमी वर्दळ असते. सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव आहे. राज्यातून व राज्याबाहेरूनही चिंच खरेदीसाठी येथे व्यापारी येतात.

बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे येथे उपबाजार आवार आहे. दर शनिवारी येथे चिंचेचा लिलाव होतो. गेल्या शनिवारी (ता.३) येथील मार्केट यार्डात सुमारे साडेसात हजार अखंड चिंचेच्या पोत्यांची आवक झाली होती. कोरोनाच्या कडक बंदमुळे एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी झालेल्या लिलावात साडेचार हजार पोत्यांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. फोडलेली चिंच प्रति क्विंटल दर ७ हजार १०० तर अखंड चिंचेचा दर २ हजार ७०० होता. चिंचोका १ हजार ३०० रूपये क्विंटल दर होता. प्रतवारीनुसार हा दर असल्याचे जगताप यांनी सांगितले.   सुप्यात चिंचेचे स्थानिक व्यापारी असून, बाहेरूनही काही व्यापारी येऊन येथे व्यवसाय करतात. थेट झाडावरून चिंच आणून ती मजूरांकडून फोडून घेऊन फोडलेली चिंच शेजारील राज्यात पाठवून व्यवसाय करतात. सध्या सुप्यात शेकडो मजूरांच्या हाताला चिंच फोडण्याचे काम मिळाले आहे. मोजून चिंच घरी आणायची. चिंच फोडून टरफल, शिरा, चिंचोका व फोडलेली चिंच वेगळी करून पुन्हा वजन करून द्यायचे.

१ किलोला १० रूपये, प्रत्येकी १५ किलो चिंचा फोडण्यामचे काम

''एक किलो चिंच फोडण्यासाठी दहा रूपये मिळतात. एका जणाला किमान १५ किलो चिंच फोडून होते. शिवाय घरातील अन्य व्यक्तीही यासाठी मदत करत असल्याने आठवड्याच्या बाजारहाटापुरता रोज मिळत'' असल्याची माहिती शालन साळुंके, मारूती सकट यांनी दिली.

नफ्याचे प्रमाण घटले

''चिंचेचा हंगाम दरवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान चालतो. सध्या सुमारे एक किलो चिंचेला साडेचारशे ग्रॅम एवढा उतारा मिळतो. त्यामुळे नफ्याचे प्रमाण घटले आहे. झाडाला मोहोर असताना झाडाचा सौदा ठरवला जातो. त्यावर नैसर्गिक संकटामुळे नुकसान होत असल्याने जोखीम पत्करून हा व्यवसाय करावा लागत '' असल्याची माहिती इब्राहिम बागवान, अच्युत नगरे, संपत जाधव या व्यावसायीकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT