tomato sakal
पुणे

‘मोझ्याक’चा टोमॅटोला तडाखा

शिवगंगा खोऱ्यातील भोर तालुक्याच्या पट्ट्यातील टोमॅटो पिकावर ‘मोझ्याक’ या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, या भागातील पिकाचे मोठे क्षेत्र संक्रमित झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

खेड शिवापूर: शिवगंगा खोऱ्यातील भोर तालुक्याच्या पट्ट्यातील टोमॅटो पिकावर ‘मोझ्याक’ या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, या भागातील पिकाचे मोठे क्षेत्र संक्रमित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आला; तर नवीन टोमॅटोचे पीक वाचवता येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या भागातील कळवडे, साळवडे, कांजळे, खोपी, शिवरे, वरवे या गावात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागात दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील हंगामात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नसरापूर विभागात या वर्षी सुमारे ७० हेकटर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड झाली आहे. मात्र, यावर्षी टोमॅटो पिकावर ‘मोझ्याक’ या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या गावांतील अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या पिकावर रोग आला आहे.

टोमॅटोला फळ लागण झाल्यावर या विषाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फळ प्लॅस्टिकसारखे टणक होते किंवा नासून जाते. फळावर चित्र-विचित्र रंगाचे डाग पडतात. तसेच, झाडाची पाने जळून जातात. त्यामुळे हाता-तोंडाला आलेले टोमॅटोचे पीक या विषाणूमुळे असे हातातून जात असल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा यक्ष प्रश्न येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे.

एक एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली असून, त्यासाठी सुमारे एक लाख रुपये भांडवल गुंतवले आहे. मात्र, यावर्षी आलेल्या मोझ्याक विषाणूमुळे संपूर्ण पीक हातातून जाणार आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे टोमॅटोच्या पिकात या वर्षी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे - दादा पवार, शेतकरी, खोपी (ता. भोर)

मोझ्याक या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची गावनिहाय माहिती घेऊन पाहणी करण्यात येईल. तसेच, ताबडतोब त्यावर काय उपाययोजना करायच्या यासंबंधी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. - देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Impact: चांदी ठरली गेमचेंजर! या उद्योगपतीची कोट्यवधींची कमाई; चांदीचे भाव वाढल्याने कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावले

रेखाने का केलेलं मुकेश अग्रवालशी लग्न? मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'तिच्या डोक्यात फक्त...

Ichalkaranji Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; भाजप-मविआकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Latest Marathi News Live Update : महायुती करायची असेल तर राष्ट्रवादीला १५ टक्के जागा हव्यातच; अजित पवारांच्या नेत्याचा इशारा

RTO Action: ओला, उबेर, रॅपिडोवर आरटीओचा छापा; नियम भंगाची दंडात्मक कारवाई!

SCROLL FOR NEXT