पुणे

कोरोनाचा संसर्ग तरुणाईला सर्वाधिक

सकाळवृत्तसेवा

पुणे - कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या ३१ ते ४० वयोगटाला पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला. सप्टेंबरनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली, तरीही कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हीच त्रिसूत्री प्रभावी असल्याचा विश्‍वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण ९ मार्चला आढळला. ९ मार्च ते ६ डिसेंबर या दरम्यान एकट्या पुण्यात कोरोनाच्या एक लाख ७२ हजार ७८ रुग्णांची नोंद महापालिकेत झाली. त्यापैकी नोव्हेंबरपर्यंत झालेल्या एक लाख ६५ हजार ३९३ रुग्णांचे वयनिहाय विश्‍लेषण महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. त्यातून उत्पादनक्षम वयोगटात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला. पुण्यातील २२ टक्के (३७ हजार ३६) संसर्ग ३१ ते ४० वयोगटातील तरुणांना  झाला. मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात सर्वाधिक रुग्ण याच वयोगटात आढळले आहेत. मात्र, सप्टेंबरपर्यंत दर महिन्याला रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती. एप्रिलमध्ये एक हजार २७९ पैकी २७२ रुग्ण या वयोगटातील होते. सप्टेंबरमध्ये ५१ हजार ५१५ होती. त्यात तरुण रुग्णांचे प्रमाण ११ हजार ८१३ असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. 

मुले, ज्येष्ठांचे प्रमाण कमी
पुण्यात कोरोनाचा सर्वांत कमी संसर्ग वय वर्षे २० पर्यंत आणि वयाची साठी ओलांडलेल्यांना झाला आहे. या दोन्ही वयोगटांत घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या आजही कमी आहे.  

शंभरीवरील तिघांना संसर्ग
शंभरी ओलांडलेल्या तीन जणांचा कोरोनाची बाधा झाली. त्यात एक रुग्ण १०१ त ११० वयोगटातील होते. तर, दोन रुग्ण १११ ते १२० वर्षे वयोगट होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी दिसते.  
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT