mp amol kolhe Sakal Media
पुणे

खताची दरवाढ कमी होण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू : डॉ. अमोल कोल्हे

खासदार कोल्हे यांनी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशीही साधला संवाद

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : “खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी शेतमशागतीची कामे सुरू केली आहेत. पण अशातच खताची दरवाढ ६० टक्के झाली आहे. खताचे बाजारभाव खत कंपन्यांनी भरमसाठ वाढविल्यामुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे. वाढलेले खतांचे दर कमी व्हावेत. म्हणून केंद्र सरकारला पत्र देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून बळीराजाला न्याय मिळवून देण्याचे काम करू.” अशी ग्वाही शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय कोविड उपचार केंद्राला डॉ. कोल्हे यांनी शनिवारी (ता. १५) रात्री भेट दिली. त्यांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सुहास बाणखेले, राजेंद्र थोरात, सरपंच जगदीश अभंग, दिनेश खेडकर, सुरेश निघोट उपस्थित होते.

सुरुवातीला डॉ. कोल्हे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन थेट उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांशी सवांद साधला. “येथे चांगले उपचार, सकस नाश्ता व जेवण मिळते, तुम्ही लवकर बरे होणार आहात.” असे सांगून त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम केले. डॉक्टर व परिचारिकांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

त्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. कोल्हे यांची भेट घेतली. “खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या दरात फार मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवणारी दरवाढ आहे. उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खताच्या किमती कमी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा.”अशी विनंती शेतकऱ्यांनी केली.

गेली सव्वा वर्ष शेतकरी कोरोना व लॉकडाउनमुळे त्रस्त झालेला आहे. शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर व राज्याच्या अन्य भागातील शेतकर्यांनी खत दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भागत नाही. ही वस्तुस्थिती केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल. खत दरवाढ रोखण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

-डॉ. अमोल कोल्हे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT