amol.jpg 
पुणे

'कोरोना'पासून बचावासाठी खासदार अमोल कोल्हेंनी सूचविला भन्नाट उपाय

सकाळवृत्तसेवा

पुणे : सध्या सोशल मिडीयातून खासदार अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला एक फोटा चांगलाचा व्हायरल झाला आहे. काय आहे, त्या फोटोमध्ये आपण जाणून घेऊयात. या फोटोमध्ये त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी काय करावे याबद्दल सांगितले आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या रोजच वाढत चालली आहे. पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. सर्वचजण कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे देखील मागे नाहीत. ते कोरोनाबाबत जनजागृती तर करत आहेतच, त्याबरोबर नागरिकांना मदत देखील करत आहेत. सध्या त्यांनी इस्टाग्रामवरती एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये एका बाजूला त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय केलेला फोटो आहे, तर दुसर्या बाजूला त्यांनी स्वत:चा मास्क घातलेला फोटो आहे. तसेच त्या फोटोखाली त्यांनी एक कोरोनाविरोधात लढण्यासाठी एक उपाय सूचविणारा मॅसेज देखील दिला आहे. सोशल मिडीयात सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.    

दरम्यान, सध्या प्रशासकीय व राजकीय पातळीवर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. खासदार कोल्हे यांनी ‘कोरोना’पासून बचावासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली आहे. या व्हायरल होणार्या फोटोमध्ये त्यांनी सर्वांनाच एक मॅसेज दिला आहे. यामध्ये ते म्हणतात, ''तलवारीला कितीही धार असो, वार अडवायला ढाल लागतेच'' माझी ढाल.. माझा मास्क! या संदेशाव्दारे त्यांनी अशा काळात मास्क किती आवश्यक आहे ते सांगितले आहे. 

खासदार कोल्हे हे खासदार असण्याबरेबरच एक उत्कृष्ट अभिनेता देखील आहेत. अभिनेता म्हणून देखील ते तेवढेच फेमस आहेत. त्यांनी केलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा रोल खूप गाजला आहे. त्याची मोठी चर्चा देखील वेळोवेळी झाली आहे. कोल्हे हे जेव्हापासून कोरोनाची साथ आली आहे तेव्हापासून अविरत त्याविरोधात काम करत आहे. मग ते काम जनजागृतीचे असो किंवा नागरिकांना मदतीचे असो.    
कोल्हे हे पेशाने डाॅक्टर असल्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात काय उपाययोजना करावयास हव्यात हे त्यांना चांगलेच माहिती आहे. यामुळे ते वेळोवेळी कोरोनाविषयी जागृती करताना दिसून येत आहेत. त्यांचा हात धुण्याचा व्हिडीओ देखील चर्चेचा ठरला होता. 

तसेच त्यांची वाईफ देखील डाॅक्टर असल्यामुळे त्या देखील कोरोनाविरोधात रूग्णांची सेवाभावी वृत्तीतून सेवा करत आहेत. सकाळच्या प्रतिनिधीशी बोलताना  ते म्हणाले “कोरोनापासून वाचण्याचा हा सर्वात साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कोरोनाला घाबरु नका पण जागरुक राहा. कोरोनाच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे.. आणि सरकारी यंत्रणेबरोबर आपली प्रत्येकाची देखील जबाबदारी आहे.. स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याची! मुखपट्टी(मास्क) चा योग्य वापर निश्चितच कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करू शकतो मग हलगर्जीपणा कशाला? मास्क हे वापराच,”

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT