Girish_Bapat 
पुणे

Video :...म्हणून खासदार गिरीश बापटांनी 'जम्बो' आंदोलन केले स्थगित!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी १९ ऑगस्टला जम्बो कोविड हॉस्पिटल उभारू असे जाहीर केले होते. ते मुदतीत सुरू होऊ शकले नाही. आम्ही संघर्ष करू इच्छित नाही. २४ ऑगस्टपासून हे हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाने आम्हाला दिले,' असे खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी (ता.१९) सांगितले. 

दिलेल्या मुदतीत जम्बो हॉस्पिटलची उभारणी न झाल्याच्या निषेधार्थ खासदार बापट यांनी बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पक्षाच्या आमदारांना घेऊन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानांवर आल्यानंतर प्रशासनाने त्यांना विनंती केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करून प्रशासनाची चर्चा केली. यावेळी आमदार मुक्ता टिळक, भीमराव तापकीर, पुप्कार तुळजापूरकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते. त्यानंतर बापट यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. बापट म्हणाले, ''हे हॉस्पिटल सुरू झाले की नाही, हे पाहण्यासाठी आलो. उशीर का झाला हे विचारायला आलो. आता संघर्षाची वेळ नाही.''

गेल्या काही दिवस शहरात संततधार पाऊस असल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. सरकारने सांगितल्याप्रमाणे ते वेळेत पुणेकरांना उपलब्ध करून द्यावे, एवढीच आमची मागणी आहे.'' प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जम्बो हॉस्पिटलची गरज काय असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर बापट म्हणाले, ''जम्बो हॉस्पिटल उभारण्यास उशीर झाला आहे. तरी माफ करतो. कारण रुग्ण संख्या कमी झाली आहे. ती कमीही झाली पाहिजे. २४ तारखेला सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन चार महिने झाले आहे. उभारणीला नाही म्हटले तर विरोध केला असे वाटेल. वाद घालायचा नाही. परंतु ज्यांच्या डोक्‍यात ही कल्पना आली आहे. ती उशिरा आली. आमची सहकार्याची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार नाही. कधी सुरू होते, पेशंट दाखल होतील, याची तारीख आम्हाला दिली आहे.'' 

जम्बो हॉस्पिटल उभारणीस उशीर झाला, अशी तक्रार सातत्याने लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. त्यावर विभागीय आयुक्त राव यांना विचारले असता, ते म्हणाले, ''असे मला वाटत नाही. कारण बाधित रुग्णांची संख्येची टक्केवारी अद्यापही २० टक्के आहे. ती कमी झाली पाहिजे. परंतु ती लगेच कमी होईल, असे वाटत नाही. सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील क्षमतेचा पुरेपूर वापर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT