Girish_Bapat_Ajit_Pawar 
पुणे

पुण्यातल्या लॉकडाउनवरून खासदार बापट यांचा अजित पवारांना टोला; पाहा काय म्हणाले!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनमुळे पुणे शहरातील कोरोनाला कुठे प्रतिबंध घालता येतो काय, असा सवाल करत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. मग पुन्हा लॉकडाउन का लावला, हे ज्यांनी लावला त्यांनाच विचारले पाहिजे असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यामुळे पुणे शहरातील कोरोना संसर्गावरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

राज्यात जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला, तेव्हा आम्ही राज्य सरकारला मदत केली, पण दुसऱ्यांदा लाॅकडाऊन करून काही साध्य होताना दिसत नाही. यापेक्षा टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे. शिवाय रुग्णालयांना ज्या महत्वाच्या गोष्टी कमी पडतील, त्या तातडीने पुरविणे गरजेचे आहे. यापुढे लाॅकडाऊन वाढविला, तर भाजप आपली भूमिका योग्य वेळी मांडेल, असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना याबाबतचे निवेदन आणि प्रतिकात्मक स्वरुपात दूधाच्या पिशव्या भेट दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बापट यांनी पवार यांच्यावर हा निशाणा साधला. 

यावेळी  भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे (ए) शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर, शहर भाजपचे सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, "कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपयांप्रमाणे थेट अनुदान मिळाले पाहिजे. हे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे. दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे. गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्यावा. या मागण्या येत्या ३१ जुलैपर्यंत राज्य सरकारने पूर्ण कराव्यात. अन्यथा १ ऑगस्ट २०२० ला राज्यव्यापी आंदोलन केले जाईल."

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार?

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT