नऱ्हे - खासदार सुप्रिया सुळे यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. 
पुणे

खासदार सुळे यांनी जाणून घेतल्या रुग्णांच्या समस्या

सकाळवृत्तसेवा

खडकवासला/ धायरी - पुणे जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या नऱ्हे येथील कोविड सेंटरला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नऱ्हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आवारात हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथील वार्डाची पाहणी करत रुग्णांसाठी ऑक्‍सिजन तसेच अन्य तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत का, डॉक्‍टर, परिचारिका, सेवक, सेविकांच्या काही समस्या आहेत का, आदींबाबत माहिती सुळे यांनी या वेळी घेतली. 

येथील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य सेवकांचा खास सत्कार करून सुळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले. खडकवासला हवेली भागातील नागरिकांसाठी सोयीचे ठरेल, असे कोविड सेंटर व्हावे यासाठी खासदार सुळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार नुकतेच हे सेंटर सुरू झाले असून, सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला राष्ट्रवादी मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, त्र्यंबक मोकाशी, शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, पंचायत समिती सदस्य ललिता कुटे, सुप्रिया भूमकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, आरोग्य प्रमुख डॉ. वंदना गवळी, डॉ. बाळासाहेब आहेर, तहसीलदार सुवर्ण बारटक्के, माजी सरपंच पोपट खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT