MPSC exams were held but the results were yet not declared 
पुणे

'एमपीएससी'च्या परीक्षा झाल्या पण, निकालांना मुहूर्त मिळेना

ब्रिजमोहन पाटील

पुणे : महाराष्ट्र शासनात मेगाभरती होणार म्हणून मोठा गाजावाजा करण्यात आला, जाहिराती काढून अर्ज मागविण्यात आले, परीक्षा झाली मात्र, निकाल लावण्यास 'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा'ला मुहूर्त मिळत नसल्याने हजारो भावी अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १ हजार ९२० पदांसाठी ५ परीक्षा झाल्या, पण असून एकाचाही निकाल लागलेला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळाली तर आयुष्यच सेट झाले म्हणून समजायचे. यासाठी राज्यभरातील पदवीधर 'एमपीएससी', 'यूपीएससी'च्या माध्यमातून नशीब आजमावत असतात. स्वयंशिस्त, योग्य मार्गदर्शन व सातत्य टिकवून अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते. मात्र, परीक्षा देऊनही अनेक महिने झाले तरी निकाल लागत नसल्याने हे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. 

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

'एमपीएससी'ने ४२० पदांसाठीची 'राज्य सेवा २०१९'ची मुख्य परीक्षा जुलै महिन्यात घेतली होती. त्याच्या मुलाखती फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या. मात्र, निकाल लागलेला नाही. याच प्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, कर सहायक, उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, लिपीक टंकलेखक या पदांची जाहीरात निघाली होती. यात सुमारे ४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २५ हजार ७२६ जण मुख्य परीक्षेला पात्र ठरले. यांची मुख्य परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आहेत. पण निकाल अद्याप ही जाहीर झालेला नाही. यासंदर्भात 'एमपीएससी'चे प्रमुख सतीश गवई यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

आदिवासींना महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

"राज्यसेवा पूर्व परीक्षेसह इतर परीक्षा मी दिलेल्या आहेत. पण निकालच जाहीर केला जात नाही. त्यामुळे आगामी परीक्षेची तयारी करावी की नाही याचा संभ्रम आहे. या परीक्षांचा निकाल त्वरीत जाहीर करावा. तसेच स्थितीत केलेल्या परीक्षांचे वेळपत्रक त्वरित जाहीर करावे."
- राहूल कवठेकर,  विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा

सावधान ! पुण्यातील `या` भागात तुमच्या सोबतही असा भयानक प्रकार घडू शकतो

"स्पर्धा परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याने पुढील परीक्षांचा अभ्यास करावा की नाही यावरून विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच राज्यभरातील विद्यार्थी गेले अनेक महिने अभ्यास करत असल्याने स्थगित परीक्षांच्या तारखांबाबत एमपीएससीने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे." 
- सचिन ढवळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

चार वर्षापूर्वी निर्देश देऊनही 'यूजीसी'च्या ऑनलाइन अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष

"एमपीएससी'ने कोरोनामुळे ज्या परीक्षा स्थगित करून पुढे ढकलल्या आहेत, त्याचे नवीन वेळापत्रक लाॅकडाऊन संपल्यावर जाहीर केले जाईल."
-सुनील औताडे, उपसचिव, 'एमपीएससी'

पुणेकरांनो, लॉकडाउनमध्ये जप्त केलेली वाहने परत मिळणार, पण....​

ट्विटरवर 'एमपीएससी' रिझल्ट मोहीम
'एमपीएससी'ने परीक्षांचे निकाल रखडवले आहेत, स्थगित केलेल्या परीक्षांचे वेळपत्रकही अनिश्चित आहे, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी  '#एमीएससी' रिझल्ट' ही मोहीम सुरू केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांना टॅक  करून स्पर्धा परीक्षांचे निकाल लवकर लावा, नवीन भरती करा, अशी मागणी लावून धरली. यासंदर्भात हजारो ट्विट पडले आहेत. 



परीक्षेचे नाव  -     पद संख्या - मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी
राज्यसेवा २०१९  -              ४२०     -     १३२६
उपनिरीक्षक उत्पादन शुल्क -  ३३     -       ८०८
लिपीक टंकलेखक             - १७९   -       ३६०८
कर सहायक                     - १२६    -       २९५७
विद्युत अभियांत्रिकी सेवा  -   १६     -       २८९
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - ११४६  -     १६,७३८
एकुण                              - १९२०    -    २५७२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT