Pole
Pole 
पुणे

Sakal Impact : धोकादायक अवस्थेतील तो विद्युत खांब महावितरणने हटवला

सकाळ वृत्तसेवा

औंध (पुणे) : शिवाजीनगर भागातील मॉडर्न हायस्कूलच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील एक झुकलेल्या अवस्थेतील विजेचा खांब हटविण्यात आला आहे. कोसळण्याची शक्यता असलेला 'विजेचा खांब बदलण्याची मागणी' या शिर्षकाखाली 'दै.सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती.

धोकादायक असणारा हा खांब काढून तेथे नवीन बसवावा, अशी मागणी दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली होती. या वृत्ताची दखल घेत हा धोकादायक विद्युत खांब महावितरणकडून हटवण्यात आला आहे. या परिसरात शाळा-महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांनी नेहमी गजबजलेला असतो. तसेच  मोठ्या प्रमाणात रहदारी असून या रस्त्यावरुन अनेक लहान मुले सातत्याने ये-जा करत असतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. 

"महावितरणने या भागातील वीजपुरवठा करणाऱ्या केबल भूमिगत केल्याने हा खांब काढायचा राहून गेला होता आणि आता तो हटवण्यात आला आहे," अशी प्रतिक्रिया शिवाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश श्रीगडीवार यांनी दिली. 'सकाळ'च्या बातमीमुळे विद्युत विभागाने तत्काळ हा खांब हटवला आणि भविष्यात होणारी दुर्घटना टळली असल्याची प्रतिक्रिया दुर्गा भोर यांनी दिली आणि 'सकाळ'चे आभारही मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT