The Mumbai High Court has directed all legal services authorities to provide free counsel to the accused 
पुणे

आरोपींकडे वकीलच नाही; मुंबई उच्च न्यायालयने दिला 'हा' आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊन काळात गुन्ह्याचे प्रमाण घटले असले तरी पूर्णतः थांबलेले नाही. त्यामुळे पोलिसांना संशयितांना अटक करून न्यायालयात हजर करावे लागत आहे. मात्र आरोपींची बाजू मांडण्यासाठी वकील मिळत नसल्याची स्थिती सध्या येथील न्यायालयात पाहायला मिळत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या न्यायालयात केवळ तात्काळ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. मात्र त्यासाठी देखील वकील मिळत नाही. त्यामुळे आरोपींना वकिलांचा शोध घ्यावा लागत आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने आता आरोपींना त्यांची बाजू मांडता यावी म्हणून विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील देण्यात येत आहे. लॉकडाउनच्या आरोपींना वकील न मिळाल्यास त्यांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील देण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सर्व विधी सेवा प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार आरोपींना मोफत वकील सुविधा देण्यात येते आहे.

पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

याविषयी अधिक माहिती देताना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी सांगितले, लॉकडाउनच्या काळात आरोपींना वकील न मिळाल्यास त्यांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकिल देण्यात येत आहेत.  प्राधिकरण कायद्यानुसार गरजु लोकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना मोफत कायदा सेवा देण्यात येते. प्राधिकरणातर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते. सध्या न्यायालयात फक्त तातडीच्या दाव्यांची सुनावणी घेतली जाते आहे. खूनाच्या एका गुन्ह्याच्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याकडे वकील नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला वकील देण्यात आला. कोर्ट हॉलमध्ये सुनावणी घेताना न्यायाधीश चेंबरमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे कोर्ट हॉलमध्ये असलेले आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्याबरोबर संवाद साधून कामकाज पाहत आहे.

पुणेकरांनो ऐकलं का? जीवनावश्‍यक वस्तूंसह इतर दुकाने खुली; कंटेन्मेंट झोनमध्ये बंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT