Corona vaccine Google file photo
पुणे

मुंबईकर, पुणेकरांनी लसीकरणात मारली बाजी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील नागरिकांनी कोरोना(Corona) प्रतिबंधक लस(Vaccine) घेण्याचा नवा उच्चांक मंगळवारी केला. एका दिवसात पाच लाख ५५ हजार ०६९ लशीचे डोस देण्यात आले. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबईकर(Mumbai) आणि पुणेकरांनी (Pune) लसीकरणात बाजी मारली.(Mumbai Pune people Active vaccination 5 lakh 55 thousand doses taken in one day)

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ७९ हजार ५१ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याबरोबरच लस हे आणखी प्रभावी साधन उपलब्ध झाले आहे. त्याला राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे चित्र आजच्या आकडेवारीतून पुढे आले आहे.

राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. सुरवातीला आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर यांना प्राधान्याने लस दिली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, प्रौढ आणि आता १८ वर्षे वयाच्या नागरिकांसाठीही लसीकरण खुले केले. त्यामुळे राज्यातील पाच हजार ९२ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस देण्याचा नवा उच्चांक करण्यात आला. आज सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून पाच लाख ५२ हजार ९०९ नागरिकांनी लस घेतली. यापूर्वी २६ एप्रिलला पाच लाख ३४ हजार जणांनी एकाच दिवशी लस घेण्याचा उच्चांक होता. तो मागे टाकून लसीकरणाचा नवीन उच्चांक केल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा सर्वांत मोठा उद्रेक मुंबई आणि पुण्यात झाला. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. मुंबईमध्ये दिवसभरात एक लाख १२ हजार ३७८ जणांनी लस घेतली. तर, पुणे जिल्ह्यातील ५६९ केंद्रांमधून ६९ हजार १२१ नागरिकांनी लस घेतली. त्यात ४०० केंद्र सरकारी असून, उर्वरित १६९ केंद्र खासगी असल्याचेही आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.

दिवसभरातील लसीकरण
राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या : ५,०९२
सरकारी केंद्रांची संख्या : ४,६७४
खासगी केंद्रांची संख्या : ४१८

आतापर्यंतचे लसीकरण
१६ जानेवारीपासून दिलेले लशीचे डोस : २,८६,९७,९४८
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या : २,३०,८२,२४३
दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या : ५६,१५,७०५

प्रमुख जिल्ह्यांतील लसीकरण
मुंबई : १,१२,३७८
पुणे : ६९,१२१
ठाणे : ६०,५८२
नागपूर : २७,०४४
नाशिक : २६,१८७
औरंगाबाद : १८,८१३
कोल्हापूर : १३,६९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Ban For Kids : कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, महाराष्ट्रात काय निर्णय होणार ?

Maharashtra Budget 2026, Nashik Kumbh Mela : आता त्र्यंबकेश्वरला मिळणार 'अमृतस्नान'! फडणवीसांच्या बजेटमध्ये नाशिक कुंभमेळ्यासाठी काय आहे खास? पाहा सविस्तर...

Maharashtra Budget 2026 : अजित पवारांच्या अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

Omkar Pawar IAS Success Story : एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा अपयश! साताऱ्याचा ओमकार कसा झाला IAS? वाचा शेतकर्‍याच्या लेकाची यशोगाथा

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरमध्ये महामार्गावर भूसंपादनाच्या बाधीत शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन

SCROLL FOR NEXT