Deccan Queen esakal
पुणे

Deccan Queen : पालिका अन् रेल्वे प्रशासनात भरडला जातोय पुणेकर

मुंबई-पुणे रोज हजारोंनी लोक डेक्कन क्वीनने प्रवास करतात.

धनश्री भावसार-बगाडे

Mumbai Pune Railway Deccan Queen : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईला आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातून रोज हजारोने प्रवासी या डेक्कन क्वीनने प्रवास करतात. यातून व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, पर्यटक महिला, पुरुष रोज अपडाऊन करतात.

मुंबई-पुणे प्रवासासाठी डेक्कन क्वीन फार महत्वाची आहे. या गाडीमुळे या प्रवासाचा बराचसा वेळ वाचतो.

पण पुणेकरांना जर कल्याण किंवा आसपासच्या भागात जायचे असेल तर मात्र फेरा मोठा पडतो. तर त्या भागातल्या लोकांना पुण्याचा प्रवास करायचा असेल तर ठाणे रेल्वे स्टेशनवरून गाडी पकडावी लागते. आधी या स्टेशनवर गाडी थांबायची पण आता मात्र कल्याणच्या महत्वाच्या स्टेशनवर थांबत नाही. पण असं का? हे आपण जाणून घेऊया.

मीडिया रिपोर्टनुसार पूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांकडून कर वसूल केला जातो. हा कर डेक्कन क्वीनकडूनही घेतला जायचा. पण रेल्वेने कल्याण पालिकेचा हा कर काही काळ थकवला होता. कल्याण पालिकेने मात्र कर न भरल्यामुळे डेक्कन क्वीनचे इंजिनच जमा करून घेतले. पुढे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि मग रेल्वेला पालिकेचा जो काही कर होता तो भरावा लागला. तेव्हा इंजिन परत करण्यात आले. पण नंतर कल्याण पालिका आणि रेल्वेमध्ये चांगलीच जुंपली.

तेव्हापासून रेल्वे पालिकेने आपला अपमान केला म्हणून या ठिकाणी डेक्कन क्वीनने न थांबण्याचा निर्णय घेतला. डेक्कन क्वीन कल्याण स्टेशनला थांबाी म्हणून रेल्वे प्रशासनाला वारंवार प्रवासी निवेदन पाठवत असले तर अपमानामुळे तिथे थांबवली जात नाही.

एकंदरीतच या निर्णयामुळे पुणेकरांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. रेल्वे आणि कल्याण पालिकेच्या मध्ये सामान्य प्रवासी मात्र भरडला जात नाही. दुसरे कारण असेही दिले जाते की, डेक्कन क्वीन ही सुपरफास्ट ट्रेन असून या गाडीला अधिक थांबे दिले तर गंतव्यस्थळी पोहचायला उशीर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT