she.jpg 
पुणे

Big Breaking : पुण्याच्या महापालिका आयुक्तांनी भरला दम, कोणाला व का? वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात सध्या काही खासगी हॉस्पिटलमध्ये वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांची प्रकृती बिघडत आहे. शहरात कोरोनाने अनेक बळी घेतले आहेत, या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कठोर भूमिका घेत खासगी हॉस्पिटलवर कारवाईचा इशारा दिला आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढून लोकांत प्रचंड भीती असतानाही रुग्णांवरील उपचारांना नकार देणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सना धडा शिकविण्याचा निर्णय घेत, महापालिकेने अशा हॉस्पिटल्सना थेट नोटिसा बजाविल्या आहेत. उपचारात दिरंगाई होणार नाही किंवा औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घेण्याचा "सल्ला'ही महापालिकेने दिला आहे.

तेव्हाच, कोरोना आणि अन्य आजारांच्या रुग्णांना दाखल करून घ्या आणि तातडीने उपचार सुरू करा, असेही बजाविण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याची आशा आहे. कोरोनाची साथ आल्यापासून विशेषत: कोरोना रुग्णांवर दाखल करून घेण्यापासून त्यांच्या उपचार करण्यास खासगी हॉस्पिटल तयार नसल्याचे दिसून आले आहे. आयत्यावेळी रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. दरम्यान, वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांची प्रकृती बिघडल्याचीही उदाहरणे पुढे आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कठोर भूमिका घेत खासगी हॉस्पिटलवर कारवाईचा इशारा दिला आहे. 

पुना हॉस्पिटलमध्ये गेलेल्या दोघा रुग्णांवर उपचार करण्यास तेथील डॉक्‍टरांनी नकार दिल्याचे उघडकी आले आहे. त्यावरून हॉस्पिटल व्यवस्थापनाला नोटिस पाठविण्यात आली आहे. उपचार न केल्याप्रकरणाचा 24 तासात लेखी खुलासा करावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा गायकवाड यांनी नोटिशीतून व्यवस्थापनाला दिला आहे. 

सध्याची स्थिती पाहाता हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कोरोना आणि अन्य रुग्णांना वेळेत उपचार द्यावेत. उपचाराबाबत बेजबाबदारपणा दाखवू नये. तसेच, उपचारांअभावी रुग्णांचा मृत्यू होणार नाही,याची काळजी सर्व खासगी हॉस्पिटल्सनी घ्यावी. तस न झाल्यास कारवाई होईल.-शेखर गायकवाड, आयुक्त महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT