पुणे

महत्त्वाच्या प्रकल्पांवर दक्षता समितीची नजर;कामांचा दर्जा व अंमलबजावणीचा वेग महापालिका तपासणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांच्या रोजच्या सुविधांपासून महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांवर आता महापालिकेच्या दक्षता समितीची करडी नजर राहणार आहे. त्यातून कामांचा दर्जा, अंमलबजावणीचा वेग आणि पूर्णत्वाचा मुहूर्त याबाबी तपासल्या जाणार आहेत. या समितीच्या अहवालावरून दोषींविरोधात कठोर कारवाई होणार आहे. त्यासाठी समितीच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री चूक दाखविण्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामांची पाहणी करावी, असा आदेशच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी दिला आहे. 

महापालिकेचे मुख्य खाते, क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कामांची तपासणी करून त्याचाच सविस्तर अहवाल आयुक्तांकडे सादर होणार आहे. या निर्णयामुळे कामांचा दर्जा राखला जाण्याची आशा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरातील विकासकामे, नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्यासाठीचा निधी आणि अंमलबजावणी या सर्व बाबींच्या अनुषंगाने महापालिकेतील खातेप्रमुख, क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची आयुक्त कुमार यांनी बुधवारी बैठक घेतली. तेव्हा प्रभागांच्या पातळीवर छोट्या-मोठ्या योजनांपासून संपूर्ण शहरासाठी आखलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. 

कामांना वेग देण्याच्या सूचना 
कोरोनाच्या साथीत महापालिकेतील प्रत्येक खात्याच्या प्रमुखांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजीही व्यक्त केली. आपल्या अधिकारातील कामांना वेग द्या, जबाबदारी एकमेकांवर ढकलू नका. ज्यामुळे नागरिकांची कामे रखडत आहेत. लोकांच्या तक्रारी सोडविल्या जात नाहीत, त्या वेगाने सोडवाव्यात, अशी तंबी आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. कोरोनाच्या कामामुळे रखडलेली नियमित कामे आता वेगाने पुढे नेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. 

अतिक्रमण खात्याचा अहवाल मागवला 
अतिक्रमण विभाग आणि काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांत कामाचा समन्वय नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्याबाबत ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयासह औंध क्षेत्रीय कार्यालयासंदर्भात तक्रारी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण खात्याच्या कामात सुधारणा करण्यापासून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी, असेही सांगितले. दरम्यान, अतिक्रमण खात्याचे मूळ काम, अतिक्रमणे, प्रत्यक्ष कारवाई आणि त्याचा परिणाम याबाबतचा अहवाल देण्याची सूचना आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांना केली आहे. पुढच्या 15 दिवसांत हा अहवाल मागविला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT