पुणे

महापालिकेच्या तिजोरीत मिळकत कराचे ३०० कोटी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांनी पुन्हा कर्तव्य बजावून पहिल्याच महिन्यात महापालिकेकडे तीनशे कोटींच्या मिळकत कराचा भरणा केला आहे. दरम्यान, ३१ मेपर्यंत करदात्यांना दहा टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी मुदतीत कर भरून सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिका प्रशासनाला चालू वर्षी सर्वसाधारण सभेने तब्बल दोन हजार २०० कोटी रुपयांचा मिळकतकर वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये पहिल्या दोन महिन्यांत म्हणजे ३१ मे अखेरपर्यंत मिळकतकराची रक्कम जमा करणाऱ्या करदात्यांना दहा टक्के कर सवलत दिली आहे. त्यामुळेच पहिल्या एका महिन्यातच पुणेकरांनी ३०० कोटींचा कर जमा केला आहे. महापालिका प्रशासनाने मिळकतकर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी गुरुवारी कर वसुलीचे उद्दिष्ट व त्यासाठी करावे लागणारे विविध प्रयत्न याचा आढावा घेतला. मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी ही माहिती दिली. 

मिळकतीबाबत न्यायालयामध्ये वाद सुरू आहेत. विविध विभागांशी समन्वय साधून वाद दूर करणे, महालोकअदालतीचे आयोजन करणे, स्वतंत्र आराखडा तयार करणे, ज्या मिळकतकरधारकांचे धनादेश वटले नाहीत, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे, तसेच यंदा शंभर टक्के करवसुलीसाठी कार्यवाही करण्याचे बैठकीमध्ये निश्‍चित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT