municipality honors the woman who gives life to small baby in garbage 
पुणे

Video : कचऱ्यातले गाठोडं उघडलं अन् बाळं दिसलं...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमधील कचरा कुंडीत टाकलेल्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला जीवदान देणाऱ्या कचरावेचक महिला लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव यांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही देखील सत्कार करण्यात आला.

कपड्यात गुंडाळून गळ्याला फास लावून कचऱ्यात टाकलेल्या एक दिवसाच्या अर्भकाला वाचवणाऱ्या लक्ष्मी डेबरे व सहकाऱ्यांचा सत्कार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या पुढाकारातुन महिला बालकल्याण समितीच्या वतीने सहकारी नगरसेविका नीता दांगट, मनीषा लडकत, स्वप्नाली सायकर, सुजाता शेट्टी व शीतल सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, समाज विकास विभाग उपायुक्त सुनील इंदलकर, नगरसचिव सुनील पारखी, उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे, सामान्य प्रशासन उपायुक्त अनिल मुळे, माध्यमिक विभाग शिक्षाधिकारी दिपक माळी, समाज कल्याण उपअधिक्षक संजय रांजणे, उज्वला ठाणगे यांच्या सह महापालिकेतील अनेक अधिकारी यावेळी  उपस्थित होते. याप्रसंगी लक्ष्मी डेबरे, मंगल जाधव यांच्यासह आरोग्य निरीक्षक सुनील डमाळे, सहा आरोग्य निरीक्षक अमोल मस्के, संदीप पवार, मुकादम सुरेखा वाघमोडे, सचिन सकट यांचा सत्कार करण्यात आला. 

भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

प्रा. ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, "शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचे मनही निर्मळ आणि मोठे आहे हे या घटनेवरून दिसले. माणुसकीला जीवंत ठेवत सर्वांना अभिमान वाटावा असे काम लक्ष्मीबाईंनी केले आहे. अवघ्या एक दिवसाच्या अर्भकाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढत जीवनदान दिले आहे. लक्ष्मी ताईंमुळे त्या बाळाला नवे जीवन मिळाले असून अशी घटना भावनिक मने जिवंत असल्याचे दाखवून देते.'' 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून 'ही' नावे निश्चित

लक्ष्मी डेबरे म्हणाल्या, "कचरा समजून बोचके बाजूला टाकले मात्र त्यात हालचाल होत असल्याने संशय आला म्हणून उघडून बघितले तर आतील दृश्य पाहून डोळ्यात पाणी तरळले. एक दिवसाच्या अर्भकाला अतिशय वाईट पद्धतीने कापडात गुंडाळून टाकले होते. एका जीवाला वाचवल्याचा समाधान आणि आनंद आहे. कचऱ्या वेचणाऱ्यांना कचऱ्यात दुसरे काही नाही ना याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.'' 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

SCROLL FOR NEXT