पुणे

खळबळजनक : भावजयीच्या प्रेमापोटी बहाद्दराने केला भावाचा खून

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर ः दीर-भावजयीच्या प्रेम प्रकरणास अडथळा ठरणाऱ्या भावाला जखमी करत अंगाला दगड बांधून विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक  प्रकार बारामती तालुक्यात सुप्याजवळील कुतवळवाडी येथे घडला. 

रामदास विठ्ठल महानवर (वय 27) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याची पत्नी ताई व भाऊ गणेश या दोघांना अटक केली आहे. मयत रामदास हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याचा भाऊ गणेश महनवर याने 25 नोव्हेंबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दिली होती.

या घटनेचा तपास करताना रामदास याचा मृतदेह कुतवळवाडीतील सकटवस्ती येथील एका विहिरीतील पाण्यात तरंगताना (ता. 28 रोजी) आढळून आला. मृतदेह बाहेर काढला असता त्याच्या पोटाला 20 ते 25 किलो वजनाचा दगड निळ्या इलेक्ट्रीक वायरने बांधलेला दिसून आला.

तसेच डोक्यावर गंभीर वार करण्यात आल्याचे दिसून आले. वडगावचे सहाय्क पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता रामदास याचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच खून केल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेचा तपास करत असताना मयत रामदास याचा भाऊ गणेश व मयताची पत्नी ही पोलिसांना विसंगत माहिती देत असल्याचे लक्षात आले. पोलिसी खाक्या दाखवत अधिक चौकशी केली असता मृताची पत्नी हिने दीर गणेश याच्या बरोबर गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. या प्रेमसंबंधात पती रामदास याचा अडसर येत होता. त्यामुळे पुर्वनियोजित कट करून रामदास याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.

दरम्यान त्यानंतर पोटाला दगड बांधत हा मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. साहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यासह उपनिरीक्षक गणेश कवितके, साहय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदर मोहरकर, विशाल नगरे, किसन ताडगे, ज्ञानेश्वर सानप यांनी या घटनेचा छडा लावला. पत्नीने पतीचा काटा काढल्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT