Crime_Pune 
पुणे

कोंढव्यात सराईत गुन्हेगाराचा खून; रक्ताच्या थारोळ्यात मिळाला पोलिसांना मृतदेह!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंढवा येथील एका सोसायटीतील सदनिकेत राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा हल्लेखोरांनी घरात घुसून खून केल्याची घटना शनिवारी (ता.११) दुपारी उघडकीस आली. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता कोंढवा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घन:श्याम उर्फ पप्पू बबनराव पडवळ (रा.कोंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडवळ विरुद्ध विविध पोलिस ठाण्यात आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळ हा कोंढवा येथील त्याच्या सदनिकेत एकटाच राहत होता. मागील दोन दिवसांपासून त्याचे नातेवाईक त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत होते. परंतु त्याच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी दुसऱ्या चावीने सदनिकेचा दरवाजा उघडला, त्यावेळी पडवळवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्याच्या कुटुंबाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.

पडवळ हा यापूर्वी नाना पेठेत राहत होता. सुरुवातीच्या काळात तो चालक म्हणून काम करत असे. मात्र नंतर त्याने बेकायदा सावकारी सुरू करुन मोठ्या प्रमाणावर पैसे कमाविले. त्यावेळी त्याचे नाना पेठेतील एका सराईत गुन्हेगाराबरोबर असलेल्या भांडणातून त्याच्यावर लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर गोळीबार झाला होता. तेव्हापासून तो कोंढव्यात राहात होता. त्याचा खून पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT