पुणे

पुण्यात पोलिस आयुक्तालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावरच गोळीबार करून खून

सकाळवृत्तसेवा

पुणे ः शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत खुनाच्या घटना घडत असताना सोमवारी सकाळी एकाचा खून झाला, तर भरदिवसा दुपारी साडेतीन वाजता पोलिस आयुक्तालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावरच एका 60 वर्षीय व्यक्तीवर गोळीबार करुन त्यांचा खून केल्याची घटना घडली. एकाच दिवशी घडलेल्या दोन खुनांच्या घटनांमुळे शहराच्या कायदा-सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याची सद्यस्थिती आहे. 

शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी नागरीक अक्षरशः त्रस्त झाले. त्यातच शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज खुनाच्या घटना घडत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातही चार दिवसांपुर्वीच एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा खून झाला. त्यापाठोपाठ सोमवारी सकाळी खराडी येथे एका सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. 

खराडीतील घटना ताजी असतानाच दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या स्टेट बॅंकेजवळील पदपथावर एका 60 वर्षाच्या व्यक्तीवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या घटनेत संबंधीत व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेली व्यक्ती ही बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

गोळीबाराची घटना घडलेल्या ठिकाणापासून पोलिस आयुक्तालय व बंडगार्डन पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. असे असतानाही थेट या परिसरात येऊन गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याची सद्यस्थिती आहे. सकाळी खून, दुपारीही परत गोळीबारातून खून आता रात्री नेमके काय होणार, अशी भिती आता नागरीकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : कोल्हापुरात खासगी बसला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT