murde 
पुणे

दौंड तालुका हादरला...तरुणाकडून पत्नी व नातलगाचा खून 

हितेंद्र गद्रे

यवत (पुणे) : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे सध्या राहत असलेल्या मंगेश अरूण जाधव (वय 35, मूऴ रा. विठ्ठलवाडी डॅमजवऴ, ता. शिरूर) याने आपली पत्नी मनीषा उर्फ हनीबाई उर्फ अशीबाई (वय 32) व नातलग दीपक वाघमारे (वय 31, रा. भोर) यांना धारदार लोखंडी कोयता व लाकडी काठीने मारहाण करून जिवे मारले, अशी माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. 

ही घटना खुटबाव गावच्या हद्दीत मटकळा वस्ती येथे काल (ता. 30) रात्रीच्या सुमारास घडली आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आरोपी मंगेश जाधव यास यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दौंडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा व यवतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पुढील तपास करीत आहेत.

खुनाचे नेमके कारण पोलिस तपासात समोर येईलच. मात्र, अशा घटना या पुढे घडू नयेत, यासाठी पोलिस सर्वोतोपरी काळजी घेतील. त्यासाठी पोलिस योग्य दिशेने तपास करतील. यातील दोषी व्यक्तीला शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा घटना घडवण्यापासून संबंधितांना या पुढे परावृत्त करण्यास उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT