Court 
पुणे

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीला जन्मठेप

सकाळवृत्तसेवा

पुणे - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या खून प्रकरणी पतीला आजन्म कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि सतत कौटुंबिक वादातून श्रीकांत चव्हाण यानं पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. या प्रकरणी सत्र न्यायाधीश रुबी मालवणकर यांनी निकाल देताना पतीला आजन्म कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खूनाच्या घटनेपासून केवळ दोन वर्षांच्या आत हा खटला निकाली काढण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत कमाल चव्हाण (वय 27, रा. कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने पत्नी संगीता यांचा 31 मार्च 2019 रोजी रात्री हडपसर परिसरात खून केला होता. याबाबत संगीता यांची आई ताराबाई राठोड यांनी वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादींची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ए. एस. गायकवाड आणि पवार यांनी मदत केली. 

2014 साली श्रीकांत आणि संगीता याचे लग्न झाले होते. त्यांना तीन आणि दीड वर्षांची दोन मुले आहेत. हे जोडपे केबलसाठी लागणारी लार्इन खणून त्यातून मिळणा-या मजुरीवर उपजीविका करीत. श्रीकांत याला त्याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. घटनेच्या वेळी श्रीकांत यांच्यासह काही कुटुंबे हडपसर भागात राहत होती. आजारी असल्याने तो घटनेच्या दिवशी कामाला गेला नव्हता. श्रीकांत आणि संगीता यांच्यात घटनेच्या दिवशी दिवसभर भांडण सुरू होते. नियमित भांडणे होत असल्याने फिर्यादींनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. 

फिर्यादींनी आरोपीला पळून जाताना पाहिले
घटनेच्या दिवशी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दीड वर्षाच्या नातूचा रडण्याचा आवाज आला. त्यामुळे फिर्यादी या श्रीकांत राहत असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी त्यांना श्रीकांत पळून जाताना तिला दिसला. तर मुलगी संगीता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. श्रीकांत याने कुऱ्हाडीने संगीता यांच्या मानेवर वार केले होते, असे फिर्यादीत नमूद आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT