Nana-Kate
Nana-Kate 
पुणे

शास्तीबाबत आताच साक्षात्कार कसा? - नाना काटे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गेली पाच वर्षे सत्तेत असणारे ‘भाऊ’, ‘दादा’ या दोन्ही आमदारांना शहरातील पाणी व शास्तीकराचा प्रश्‍न सोडवता आलेला नाही. आता राज्यातील सत्ता गेल्यानंतर एका महिन्याच्या आत सरकारवर नाराजी व असंतोष असल्याचा साक्षात्कार त्यांना कसा झाला? असा प्रश्‍न महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित करून आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

शहरातील अनधिकृत बांधकामांसह शास्तीकराचा प्रश्‍न मार्गी लागत नाही म्हणून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार झाले. त्यांना गेल्या पाच वर्षांत शहरातील शास्तीकराचा प्रश्‍न मार्गी लावण्यात काही अंशी यश आले, असे सांगताना स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न आता ते करताना दिसत आहेत. तसे त्यांनी दिलेल्या कबूल केले आहे. एक हजार चौरस फुटापर्यंत निवासी बांधकाम असलेल्या नागरिकांना करात सूट देण्यात आल्याचे सरकारने वेळोवेळी घोषित केले. त्या वेळी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढेही भरवले होते, असे सांगून काटे म्हणाले, ‘‘आता शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही २५ नोव्हेंबरपासूनच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. अनेक ठिकाणी दूषित व विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. 

शहराला समान पाणीपुरवठा करण्यासाठी योजना मार्गी लागत नाहीत. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणीकपात करावी लागते, असे दोन्ही आमदार सांगतात.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT