nana nani park.jpg 
पुणे

नाना-नानी पार्कमध्ये रंगतायेत दारूच्या पार्ट्या

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील पाच एकर जागेत सुमारे 35 ते 40 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतच्या वतीने सुरु करण्यात आलेला ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क व तरुणांसाठी ओपन जिमच्या जागेचा उपयोग तळीराम दारू पार्टी, गांजा ओढण्यासाठी करत आहेत. दारू पिणारे ज्येष्ठ नागरिकांना शिवीगाळ व दमदाटी करतात. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषद व ग्रामपंचायतच्या वतीने महादेव मंदिर परिसरात पाच एकर जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, नाना नानी पार्क व तरुणांसाठी ओपन जिम उभारण्यात आलेल्या परिसराला संरक्षक भिंत, जागा सुधारणा, व्यायाम साहित्य, जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी एकूण 35 ते 40 लाख रुपये खर्च करण्यात आला.
दररोज पहाटे व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला नाना नानी पार्क येथे फिरण्यासाठी व व्यायामासाठी येत असतात. स्थानिक तरुण सायंकाळी चार नंतर क्रिकेट व्हॉलीबॉल खेळण्यासाठी व व्यायामासाठी गर्दी करतात मात्र, मागील काही दिवसांपासून अज्ञात तरुण या नाना नाणी पार्क चा उपयोग दारू पार्टी, गांजा ओढण्यासाठी करत असल्याच्या ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत. 

ज्येष्ठ नागरिक या तरुणांना समजावण्यासाठी गेले असता ज्येष्ठ नागरिकांना दमदाटी व शिवीगाळ केल्याने येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला मद्यपींना घाबरुन या ठिकाणी येण्याचे बंद झाले आहे. परिसरात जेष्ठ नागरिक येत नसल्याने काही ठिकाणी गवतही वाढले आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने होत आहे.
 

याबाबत मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अवैध दारू पार्टी करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन कायद्याचा जरब दाखवला जाईल व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT