Congress-Prithviraj-Chavan 
पुणे

आगामी अर्थसंकल्प हा मोदी-शहांचा असेल : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा अर्थसंकल्पाचे काम करीत आहेत. हा अर्थमंत्र्यांचा अपमान आहे. त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांचा नसून, मोदी-शहा यांचा असले, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

देशाची आर्थिक परिस्थिती, एक फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प या पार्श्‍वभूमीवर बुधवारी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्या वेळी त्यांनी हा आरोप केला. याप्रसंगी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड उपस्थित होते. अर्थमंत्रालय आणि अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतात. परंतु देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान आणि गृहमंत्री हे अर्थमंत्र्यांना डावलून अर्थसंकल्पाची तयारी करीत आहे.

अर्थसंकल्पापूर्वी विविध घटकांच्या बैठका घेण्याची परंपरा आहे. तशा आतापर्यंत पंधरा बैठका झाल्या. परंतु त्या मोदी आणि शहा यांनी घेतल्या. त्यापैकी एकाही बैठकांना सीतारामन उपस्थित नव्हत्या, असे सांगून चव्हाण म्हणाले, ''अर्थमंत्री तुम्हाला मान्य नाही, तर त्यांना बदला. परंतु अशा प्रकारे त्यांना वागणूक देणे हे चुकीचे आहे. हा अर्थमंत्र्यांचा अपमान आहे.'' 

नोटाबंदी, जीएसटी यांची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी, काळा पैसा आणण्यात आलेले अपयश, बॅंकांचे गैरव्यवहार यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. विकास दर 4.8 टक्‍क्‍यांवर आला आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. अशी परिस्थितीत राहिली, तर पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागेल. 
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT