PIFF 
पुणे

ऑनलाइन ‘पिफ’ला देशभरातून प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत चित्रपट रसिक मात्र घरबसल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत. गुरुवार (ता. १८) पासून सुरू झालेल्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफला राज्याबरोबरच देशभरातून रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटांचे विषय, त्यांची निवड आणि ऑनलाइन व्यासपीठाच्या सुरक्षिततेची खात्री यामुळे चित्रपटप्रेमी सुखावले असून समाज माध्यमांवर देखील ऑनलाइन ‘पिफ’ ट्रेंडिंगमध्ये आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘लैला इन हायफा’ या चित्रपटाने १९ व्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. याविषयी अधिक माहिती देताना महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘‘कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर चित्रपटगृहात होणारा महोत्सव तात्पुरता स्थगित करीत १८ ते २५ मार्च दरम्यान ऑनलाइन महोत्सव करण्याचा आम्ही निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन महोत्सवाला चित्रपट रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला, याचा आम्हाला आनंद आहे. केवळ राज्यामधूनच नव्हे तर देशभरातून रसिकांनी यासाठी नोंदणी केली असून ते त्यांच्या सोयीने सुरक्षितपणे घरामध्ये बसून महोत्सवाचा आस्वाद घेत आहेत. उत्तरप्रदेश, तमिळनाडू, दिल्ली, पंजाब, आसाम अशा अनेक राज्यांमधून प्रेक्षक महोत्सवात सहभागी झाले असून जागतिक चित्रपट विभागात निवडलेल्या चित्रपट, माहितीपट यांचे कौतुक देखील करीत आहेत.’’

या वर्षीच्या ऑनलाइन महोत्सवासाठी न्यूझीलंड येथील शिफ्ट ७२ या व्यासपीठाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पायरसी, रेकॉर्डिंग करता येणे शक्य नसल्याने सुरक्षिततेची भावना असल्याचे अनेक प्रेक्षकांनी कळविले आहे. एकीकडे चित्रपटांचा आस्वाद घेत असताना दुसरीकडे प्रेक्षक समाज माध्यमांवर देखील महोत्सवाबद्दल भरभरून बोलत आहेत. 

अनेक समीक्षक आपापल्या ब्लॉग्जवरून महोत्सवाचे कौतुक करीत आहेत. प्रेक्षकही फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींवर फोटो शेअर करीत ‘पिफ’ ट्रेंड देखील करीत आहेत. शिफ्ट ७२ सोबतच महोत्सवात निवडलेल्या गेलेल्या चित्रपटांच्या दूतावासांनी देखील आपापल्या पातळीवर महोत्सवास प्रसिद्धी दिली असून आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रामुख्याने आतापर्यंत भारतात प्रदर्शित न झालेले चित्रपट घरबसल्या पाहता येत असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT