NCP gets more seats rather than congress in Pune
NCP gets more seats rather than congress in Pune  
पुणे

Vidhan Sabha 2019 : पुण्यात राष्ट्रवादीच ठरला "बिग ब्रदर' 

संभाजी पाटील

पुणे : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कॉंग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र आघाडीतील छोटा भाऊ म्हणून तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच पुण्यावर दावा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुण्यात एक जास्तीची जागा मिळविण्यात यश आल्याने यापुढील निवडणुकांमध्ये पुण्यात राष्ट्रवादीच "बिग ब्रदर' राहणार हे निश्‍चित. 

पुणे शहरातील विधानसभेच्या आठ जागांपैकी चार-चार जागा दोन्ही कॉंग्रेसला मिळतील अशी अपेक्षा होती. कॉंग्रेसकडून यावेळी पर्वतीसाठी मोठ्याप्रमाणावर आग्रह धरण्यात आला होता. पण शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट आणि कसबा या तीनच जागा कॉंग्रेसकडे राहिल्या असून वडगावशेरी, कोथरूड, खडकवासला, पर्वती आणि हडपसर या पाच जागा राष्ट्रवादीने पटकावल्या आहेत. त्यामुळे शहरात कॉंग्रेसपेक्षा आमचीच ताकद जास्त असल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा खरा ठरला आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडे आलेल्या शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट आणि कसबा या तीन मतदारसंघात मोहन जोशी यांना इतर पाच मतदारसंघाच्या तुलनेत चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहतील यावर शिक्कामोर्तब झाले होते. पण पर्वती मतदारसंघात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे सचिन तावरे शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा अशी मागणी करण्यात येत होती. बागूल यांनी जोरदार तयारीही केली होती. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोडला नाही. परिणामी कॉंग्रेसला 2009 च्या आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मिळालेल्या चार मतदारसंघापैकी एक मतदारसंघ गमवावा लागला. 

2009 मध्ये हडपसरला बाळासाहेब शिवरकर, शिवाजीनगरला विनायक निम्हण, पुणे कॅन्टोंमेंट मध्ये रमेश बागवे आणि कसबा पेठेतून रोहित टिळक यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यापैकी निम्हण आणि बागवे विजयी झाले होते. 2014 मध्ये आघाडी झाली नसल्याने सर्व आठ जागा कॉंग्रेसने लढविल्या त्यात शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट आणि कसबा या तीन ठिकाणी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या तीन जागाच कॉंग्रेसला या निवडणुकीत मिळाल्या. 

कॉंग्रेस आघाडीचा जो फॉर्म्युला ठरला त्यात 2014 च्या निवडणुकीतील विद्यमान आमदारांच्या जागा ज्या-त्या पक्षाला, दुसऱ्या क्रमांकाच्या जागा ज्या-त्या पक्षाला दिल्या जातात. याच क्रमाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला शहरात पाच जागा मिळाल्या असल्याचे सांगण्यात येते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शहर व जिल्ह्यातही कमी जागा दिल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले होते, पण शहरातही आता पाच जागा मिळाल्याने कॉंग्रेसला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागणार असून, पुढील महापालिका आणि लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार हे नक्की. 

2014 च्या निवडणुकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या स्थानावर होते 
वडगावशेरी : कॉंग्रेस (पाचव्या) ; राष्ट्रवादी (तिसऱ्या) 
शिवाजीनगर : कॉंग्रेस ( दुसऱ्या) : राष्ट्रवादी (तिसऱ्या) 
कोथरूड : कॉंग्रेस (पाचव्या) ; राष्ट्रवादी (तिसऱ्या) 
खडकवासला : कॉंग्रेस (पाचव्या ) : राष्ट्रवादी (दुसऱ्या) 
पर्वती : कॉंग्रेस (चौथ्या) ; राष्ट्रवादी (पाचव्या) 
हडपसर : कॉंग्रेस (पाचव्या) ; राष्ट्रवादी (तिसऱ्या) 
पुणे कॅन्टोंमेंट : कॉंग्रेस (दुसऱ्या) ; राष्ट्रवादी (पाचव्या) 
कसबा : कॉंग्रेस (दुसऱ्या) राष्ट्रवादी (चौथ्या) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT