pune corporation file photo sakal
पुणे

ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्यास आता राष्ट्रवादीचा विरोधच

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला आहे

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेच्या (pune corporation) अॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घकाळ मुदतीने भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने आता पूर्ण विरोध करण्याचीच भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मदत केल्याने पक्षाचे नुकसान होईल त्यामुळे निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या ८५ आरक्षणाच्या आणि १८५ ॲमेनिटी स्पेसच्या (सुविधा क्षेत्र) जागा खासगी व्यावसायिकांना दीर्घमुदतीने भाड्याने देण्याच्या विषयावर मुख्यसभेत प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली.

या जागा भाड्याने देताना ३३ टक्के जागा अर्बन फॉरेस्टसाठी राखीव ठेवावी व जागांच्या वापराचा मास्टर प्लॅन तयार करावा या मागणीवरून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला पण त्यास अनेक पदाधिकार्यांचा विरोध होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याने गुरूवारी (ता. २६ ) मुख्य सभेच्या काही तास आधी भूमिकेवरून कोलांटउडी घेतली. पदाधिकार्यांनी एकमताने निर्णय घ्यावा असे पवार यांनी सांगितले असताना उलट पक्षात गोंधळ निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीस शहराध्यक्षांसह खासदार, आजी-माजी आमदार, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.

बैठकीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून झालेल्या गोंधळाबाबत चौकशी केली. त्यावेळी प्रसार माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला असे पवार यांना सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पदाधिकार्याची भूमिका ऐकून घेतली. त्यामध्ये अॅमेनिटी स्पेसच्या मुद्द्याला पूर्ण विरोध केला पाहिजे. भाजपसोबत जाणे योग्य नाही. जर पाठिंबा दिल्यास त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होईल असे मत पदाधिकार्यांनी मांडले.

तसेच अ‍ॅमेनिटी स्पेसच्या ३३ जागा अर्बन फाॅरेस्ट आणि ३३ जागा रुग्णालय, शाळांसाठी आरक्षीत ठेवल्या पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली. मास्टर प्लान तयार करून महापालिकेने त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या पाहिजेत, त्यानंतरच यास पाठिंब्याचा विचार केला पाहिजे. पण सध्या या प्रस्तावास विरोध केला पाहिजे, असेही मत पदाधिकार्यांनी व्यक्त केले. पवार यांनी सर्वांची भूमिका ऐकून घेत, मुख्यसभेत अ‍ॅमेनिटी स्पेसवा विरोध करण्याची भूमिका मान्य करत, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश पदाधिकार्यांना दिले.

"३३ टक्के अर्बन फाॅरेस्ट व मास्टर प्लॅन भाजपनै तयार केला नाही आणि या बदलास त्यास पाठिंबा देण्याची भूमिका ती त्या दिवसापुरतीच मर्यादित होती. आता त्याचा काही संबंध नाही त्यामुळे या प्रस्तावास विरोध केला जाईल, असे बैठकीत ठरले आहे."

- अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT