पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेेत्याकडून गोपीचंद पडळकर यांचे समर्थन

मिलिंद संगई

बारामती : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लढणा-या आमदार गोपीचंद पडळकर यांची पोलिसांनी मुस्कटदाबी केल्याचा निषेध राष्ट्रवादीचे दौंड तालुका निरिक्षक बापूराव सोलनकर यांनी केला आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पडळकर यांची मुस्कटदाबी होत असल्याचा निषेध केला आहे.

बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ
 
या पत्रकात सोलनकर नमूद करतात, आज विधानभवनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पडळकर यांनी धनगर आरक्षण आणि भाजप सरकारच्या काळात धनगर समाजासाठी 22 योजना लागू केल्या होत्या तसेच 1000 कोटी देण्याची तरतूदही केली होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन वर्ष लोटले तरी या योजनांबाबत सरकारने साधी चर्चाही केली नाही, हा धनगर समाजावर अन्याय आहे.  हाच मुद्दा  घेऊन पडळकर यांनी धनगर समजाची वेशभूषा परिधान करून ढोल वाजवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला,  परंतु तेथील पोलिसांनी धनगर समाजाच्या मागण्यांचे बोर्ड तोडून टाकले व आंदोलन करण्यास मनाई केली.

एखादा  समाजाचा नेता आंदोलन करत तर पोलिसांनी अशी दडपशाही करणे चुकीचे आहे यामध्ये धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहे अशी कृती करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी मागणी केली आहे. हा प्रश्न पक्षीय नसून धनगर समाजाच्या भावना यात आहेत, त्या कडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही सोलनकर यांनी नमूद केले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT