ncp leader sharad pawar reaction on chandrakant patil 
पुणे

'महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं'; शरद पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सातत्याने चंद्रकांत पाटील टीका करताना दिसतात. आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मिश्कील शैलीत, चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

न्यायाधिशांच्या वक्तव्यावर भाष्य
पत्रकारांशी बोलताना, शरद पवार यांनी चीन, पाकिस्तान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करण्यास नकार दिला. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या वक्तव्यावर मात्र शरद पवार यांनी खेद व्यक्त केला. पवार म्हणाले, 'माजी सर न्यायाधीशांच विधान धक्कादायक आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला की काय हे मला ठाऊक नाही. मात्र, त्यांचं हे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणारं आहे. न्यायव्यवस्था किती उच्च आहे, हे न्यायाधिशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं. पण, त्यानंतरचं हे विधान निश्चितच चिंताजनक आहे.'

चंद्रकांत पाटील यांना टोला
चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने राज्य सरकारवर टीका केली आहे. मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोप किंवा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील शिवसेना मंत्र्यांवर उठलेली संशयाची सूई, यासगळ्यावरून चंद्रकांत पाटील सरकारवर टीका करत आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, 'महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं. ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याविषयी मी काय बोलणार.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT