Rohit_Pawar 
पुणे

रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला; 'पेट्रोल-डिझेल दरवाढ आटोक्यात आणायचीय तर...'

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गेला महिना गाजला तो पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या दरांमुळे. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला झळ बसत आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांत-गावात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार त्यांनी केंद्र सरकारला एक सल्ला दिला आहे. 

विरोधकांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी मोदी सरकारवर टीकांचा भडीमार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य, तेल कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्री यांच्याकडून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे विशेष मागणी केली आहे.

ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, ''पेट्रोल-डिझेल या इंधनांचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहेच; मात्र, एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्यानं विचार करेल, ही अपेक्षा.'' 

तत्पूर्वी, इंधनावरील कर कधीपर्यंत कमी होईल, हे मी सांगू शकत नाही, पण केंद्र आणि राज्यांना मिळून एकत्रितपणे हे कर कमी करावे लागतील. काही राज्यांनी आपल्या स्तरावर इंधनावरील दर कमी केले आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या. 

मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणतेच बदल केले नाहीत. मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपये तर डिझेल ८८.६० रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत पेट्रोल ९१.१९, डिझेल ८१.४७ रुपये, तर चेन्नईमध्ये पेट्रोल ९३.१७ रुपये तर डिझेल ८६.४५ रुपये प्रतिलिटर आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे गेल्या एप्रिल ते डिसेंबर २०२० या ९ महिन्यांत पेट्रोलियम क्षेत्रातून ४.२१ लाख कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaijapur Accident: अंत्यविधीसाठी जाताना दांपत्याचा मृत्यू; वैजापूर गंगापूर राज्य रस्ते मार्गावर भीषण अपघात

Pune News : भिडे वाडा स्मारकाचे काम जोरात; नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पूर्ण होण्याची शक्‍यता

Sugarcane protest: आंदोलनाचा भडका कर्नाटकात; दिलासा महाराष्ट्राला, दोन्ही राज्यांच्या हक्काचा ऊस सुरक्षित..

Latest Marathi News Live Update : निवडणुकांमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढं जाण्याची शक्यता

Pune : एक कोटी मला, एक कोटी साहेबांना; PSIने मागितली २ कोटींची लाच, ४६ लाख घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT