NCP-Supriya-Sule 
पुणे

Video : सुप्रिया सुळे पुणे विद्यापीठातील आंदोलकांच्या भेटीला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संसदेत मंजूर झालेला नागरिकत्व सुधारणा कायद्यासह 'एआरसी'च्या विरोधात शहरात सलग तिसऱ्या दिवशी शहरात पडसाद उमटले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संविधान स्तंभ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी 'सीएए से आझादी', 'एनआरसी से आझादी' अशा घोषणांनी विद्यापीठाचा परिसर दणादूण गेला.

एनआरसी विरोधी कृती समितीतर्फे बुधवारी (ता.18) सायंकाळी पुणे विद्यापीठात या मोर्चाचे आयोजन केले होते. खासदार सुप्रिया सुळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यामध्ये सहभागी झाले होते. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून या मोर्चाला सुरूवात झाली. मशाल पेटवून हलगीच्या तालावर मोर्चात सहभागी झालेल्या तरुण तरुणींनी घोषणाबाजी सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची तुलना हिटलरशी करणारे, तसेच देशाच्या संविधानाच्या हेतूलाच सुरूंग लावला जात आहे, अशा अशायाचे फलक हातामध्ये घेऊन या कायद्याचा कडाडून विरोध केला. आंबेडकर पुतळा येथे तरुणांनी गाणी सादर केल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.

सोमवारी विद्यापीठात शहरातील पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. 

संभाजी उद्यानासमोर आसामी तरुणांचे आंदोलन 

पुण्यात स्थायीक झालेल्या आसामी विद्यार्थ्यांचे आंदोलन दोन दिवसांपूर्वी दडपल्यानंतर आसामी नागरिकांनी बुधवारी पुन्हा एकत्र येत सकाळी जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानासमोर नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण या कायद्यामुळे स्थानिक आसामी नागरिकच अल्पसंख्यांक होतील, अशी भीती आम्हाला आहे. त्यामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे, बिद्युत सैकिया यांनी सांगितले. 

भाजप सरकारने संविधान विरोधी कायदा केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करण्यासाठी, देश वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणे हे दुर्देव आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असून संघर्ष करू पण आम्ही स्वाभीमानाने जगू. हा कायदा रद्द करून देशाची शान टिकली पाहिजे. आंदोलन करताना काही जण उचकविण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी आंदोलन शांततेत झाले पाहिजे. 
- सुप्रिया सुळे, खासदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

SCROLL FOR NEXT