Pune_Navale_Bridge 
पुणे

पुण्यातील नवले पुलाचा मुद्दा पोचला संसदेत; खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

धायरी (पुणे) : कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील नवले ब्रीज ते कात्रज दरम्यानच्या रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (ता.११) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. त्यावर आगामी सहा महिन्यात हा प्रश्न निकालात निघेल, अशी ग्वाही केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

कात्रज बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ सातत्याने होत असलेली कोंडी, सातरकडील बाजूने दरी पुलावरून येणाऱ्या अवजड वाहनांना होणारे जीवघेणे अपघात, कात्रज बाजूकडे प्रलंबित राहिलेली रुंदीकरणाची कामे यांमुळे दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहतुकीचे प्रश्न वाढतच चालले आहेत. याशिवाय सतत होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. 

या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन सुप्रिया सुळे या सातत्याने राष्ट्रीय रस्ते महामंडळ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहेत. गुरुवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुन्हा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर नितीन गडकरी यांनी उत्तर देताना या भागातील एक भुयारी मार्ग पुढील काही दिवसांतच पूर्ण होणार असून आणखी एका पुलाचे काम लवकरच सुरू होईल. तसेच रस्ता रुंदीकरण आणि इतर कामेसुद्धा आगामी सहा महिन्यांत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 'सकाळ'ने नवले पूल आणि तेथील कामांसंबंधीचा सतत पाठपुरावा केला होता, त्याला आता यश मिळाले आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT