NCP Rohit Pawar critisize devendra fadnavis over pravin gopale shirgaon sarpanch murder shares video  
पुणे

Video : "देवा भाऊंच्या काळात गुन्हेगारी झाली कमी? की…"; राष्ट्रवादीचा सरपंचाच्या निर्घृण हत्येनंतर सवाल

रोहित कणसे

पुणे : मावळ तालुक्यातील शिरगावचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची तिघांनी धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याच्या प्रकाराने पुणे जिल्हा हादरून घेला. शनिवारी (ता. १) रात्री घडलेल्या या प्रकरानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गुन्हेगारी कमी झाली की देवाघरी पाठवण्याची हमी दिली जातेय असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

"देवा भाऊंच्या काळात गुन्हेगारी झाली कमी? की, देवाघरी पाठवण्याची दिली जातेय हमी? हाच का तुमचा धाक? #देवा_भाऊ_सुपरफास्ट" असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये राज्यात महायुती आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी दर कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

रोहित पवार ट्वीट

फडणवीसांच्या त्या पोस्टरमध्ये राज्यात गुन्ह्यांचा तपास अधिक जलद होऊन गुन्हेगारी सिध्दता दरात वाढ झाल्याचे म्हटले आहे. २०१० मध्ये ८ टक्के वरून २०२३ मध्ये ४८ टक्क्यांपर्यंत गुन्हेगारी सिध्दता दर वाढला असल्याचे सांगण्यात आले आहे. या सोबतच रोहित पवारांनी राष्ट्रवादी सरपंचाच्या निर्घूण हत्येची व्हिडीओ क्लिप देखील जोडली आहे. ज्यामध्ये तिन दुचाकीस्वार एका व्यक्तीवर वार करताना दिसत आहेत.

हत्या झालेले सरपंच राष्ट्रवादीचे..

गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना बिनविरोध सरपंच म्हणून त्यांची निवड झाली होती. शनिवारी रात्री शिरगाव येथील साई मंदिरासमोर ते मित्रांसह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले.

हत्या का झाली?

या हल्ल्यामध्ये गोपाळे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोपाळे यांना तातडीने रुग्णालतात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा खून कोणत्या कारणावरून झाला. हल्लेखोर कोण आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. गोपाळे हे जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. शिरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT