corona 
पुणे

आंबेगाव, मुळशीत वाढलेत कोरोनाचे एवढे रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पुणे  : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आठशेच्या दिशेने चालल्याने नागरिकांनी आणखी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, आंबेगाव तालुक्यात सोमवारी (ता. १०) कोरोना पॉझिटिव्ह तेरा रुग्ण आढळून आले आहेत. 

मंचर  : आंबेगाव तालुक्यात सोमवारी (ता. १०) कोरोना पॉझिटिव्ह तेरा रुग्ण आढळून आले आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२६ झाली आहे., अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

मंचरला सहा, पिंपळगाव खडकी व मांदळेवाडी येथे प्रत्येकी दोन, घोडेगाव, चास व अवसरी खुर्द येथे प्रत्येकी एक याप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांनाची आजाराची तीव्रता लक्षात घेऊन भीमाशंकर हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय मंचर व अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स नियम वापरावा. दुकानांमध्ये साहित्य खरेदी करताना अजिबात गर्दी करू नये. मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिरंगुट  : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आठशेच्या दिशेने चालल्याने नागरिकांनी आणखी काळजी घेणे गरजेचे आहे. आज तालुक्यात नवीन २० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ७८३ झाली आहे. 


मुळशी तालुक्यात आज बावधन येथे १ , सूस येथे २, हिंजवडी येथे ७, चांदे येथे २, घोटावडे येथे २, माण येथे ३, भूगावला १, तर पिरंगुटला २ रुग्ण सापडले आहेत. आज बरे होऊन घरी सोडलेल्यांमध्ये १० रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या आता ६१६ झाली आहे. आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. आज अखेर तालुक्यातील मृतांची संख्या २३ आहे. होम क्वारंटाइनची संख्या १६ आहे. सध्या रुग्णालयात १४४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांपैकी १ रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असून, अतिदक्षता विभागात ४ रुग्ण उपचार घेत आहेत.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT