stu.jpg
stu.jpg 
पुणे

पुणे : जिल्ह्यातील नवे कंटेन्मेंट झोन जाहीर; तुमचा तालुका आहे का पाहा...

सकाळवृत्तसेवा

पुणे  : महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात ग्रामीण भागातील 11 तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेंनमेन्ट झोन) जाहीर करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीसारखेच कडक निर्बंध राहतील. मात्र, अन्य भागात काही सवलती दिल्यामुळे तेथील सामान्य जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात हे बंद राहील 

-सार्वजनिक बस वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा, आतंरजिल्हा, आंतरराज्यीय वाहतूक 

-सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था

-सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार आणि सभागृह
-सामाजिक, राजकीय, खेळ मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मेळावे.

-सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद. धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास मनाई 
- सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा टॅक्सी, कॅब सेवा, बस सेवा सलून, स्पा दुकाने.
 

प्रतिबंधित क्षेत्रात हे सुरू राहील : 

- वैद्यकीय सेवा, औषध विक्रीची दुकाने, दूध, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा 
- पाणी टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल वाहन, कचरा वाहतूक गाडी
- दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण सुविधा 


तालुकानिहाय प्रतिबंधित गावांची नावे : 

हवेली तालुका : 
मांजरी खुर्द गावठाण, मांजरी बु., झेड कॉर्नर, महादेवनगर, शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद- कवडीमाळवाडी, लोणीकाळभोर-गावठाण-विश्वराज हॉस्पिटल परिसर,  फुरसुंगी-हांडेवाडी, फुरसुंगी -पिसोळी-अंतुलेनगर,  वाघोली-केसनंद-जोगेश्वरीरोड- सदगुरुपार्क, पेरणे-लोणीकंद गावठाण, वाघोली- गो-हेवस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, आजाळवाडी रोडवरील गणेशनगर, गणेशपार्क कावडेवाडी, बकोरी-प्रिस्टीनसिटी फेज-१,  किरकटवाडी-कोल्हेवाडी,  कोल्हेवाडी (खडकवासला), जे.पी.नगर गोसावी बस्ती (नांदेड), कोंढवे धावडे- ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, नरहे  गोकुळनगर, नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्पलेक्स, कंजावस्ती कृष्णाईनगर, भिलारवाडी,  जांभुळवाडी-गावठाण, उरळी कांचन -आश्रमरोड, खानापूर.

बारामती तालुका : 
माळेगाव बुद्रुक, कटफळ, वडगाव निंबाळकर 

इंदापूर तालुका : 
शिरसोली

शिरूर तालुका : 
माळवाडी परिसर (महाराष्ट्र औद्योगिक विकास | महामंडळाच्या औद्योगिक आस्थापना वगळून), तळेगांव ढमढेरे गावठाण, शिवतक्रार म्हाळुंगे, कवठे यमाई, टाकळीभीमा

वेल्हा तालुका : 
सुरवड, कोदवडी, सोंडे  कारला, वडगाव झांजे

दौंड तालुका : 
राज्य राखीव बल गट क्र. 5 आणि 7,  सीआरपीएफ प्रशिक्षण वसतिगृह नवीन परिसर, दहिटणे, मिरवाडी, नांदुर, खामगांव, गणेशनगर, देवकरमळा, बैलखिळा, डुवेवाडी, मेरी मेमोरियल हायस्कुल गिरीम, दौंड शहर व बिगर नगरपालिका हद, गोपाळवाडी म्हसोबा मंदिर, भोहिटे नगर, गोपाळवाडी एस्सार पेट्रोल पंप, दत्तनगर व जिजामाता शाळा परिसर, लिंगाळी माळवाडी (वेताळनगर), म्हसनरवाडी (जगताप व जगदाळे वस्ती), सोनवडी, पवार वस्ती, दळवीमळा.

खेड तालुका :
राक्षेवाडी, चाकण येथील झित्राईमळा प्रभाग क्रमांक दोन

मावळ तालुका :
माळवाडी, तळेगाव शहर, अहिरवाडी, वेहेरगाव, दहिवली, चांदखेड

पुरंदर तालुका : खोमणे आळी

मुळशी तालुका :
भोईरवाडी येथील मेगापोलीस सिटी इमारत ए- 20, जांबे

आंबेगाव तालुका : साकोरे

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्र वगळता व्यापार, उद्योग, बांधकाम व्यवसायाला गती : 

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ग्रामीण भागात सवलती देण्यात आल्यामुळे व्यापार, उद्योग आणि बांधकाम व्यवसायाला गती मिळणार आहे. रिक्षा आणि कॅब चालकांना चालक व्यतिरिक्त दोन व्यक्तींच्या वाहतुकीसाठी परवानगी, सलून, ब्युटी पार्लर, मॉलमधील अत्यावश्यक सेवा, सर्व दवाखाने, औषध विक्री दुकाने, वैद्यकीय उपकरणे, अन्नप्रक्रिया उद्योग, ब्रेड उत्पादक कारखाना, पिठाची गिरणी, दाल मिल, दूध प्रक्रिया केंद्र सुरू राहतील.

सरकारी कार्यालयात 100 टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सर्व खासगी कार्यालये, वर्तमानपत्रे वितरण
एटीएम, बँका, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्या, घरपोच अत्यावश्यक वस्तूंचे वितरण, कुरिअर सेवा, पोस्ट ऑफिस, होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि किचन सुरू राहतील.
- बांधकामांना परवानगी मजुरांना कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आवश्यक. पूर्व पावसाळी कामे, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची कामे, मेट्रोची कामे, धोकादायक इमारतीच्या सुरक्षिततेबाबत आणि पूर परिस्थिती होऊ नये अशा कामांना परवानगी.

- गृहनिर्माण सोसायटी, कार्यालयांसाठी सेवा आणि सुरक्षा पुरविणार्‍या खासगी संस्थांना परवानगी
- अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत. गर्दी झाल्यास ती दुकाने बंद करणार.
- क्रीडा संकुल, खेळाचे मैदान आणि सार्वजनिक जागा व्यक्तिगत व्यायामासाठी खुल्या 
- सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आणि प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT