.A new medical college will be set up on the site of the old Naidu hospital 
पुणे

सकाळ एक्‍झक्‍युलिझिव्ह : नायडू'ची "साथ' तुटणार !

योगिराज प्रभुणे

पुणे : प्रत्येक साथीच्या उद्रेकात पुणेकरांना आवर्जून साथ देणारे आणि उद्रेक ओसरल्यानंतर तितक्‍याच वेगाने सोईस्कर दुर्लक्ष होणारं संसर्गजन्य रोगांवरील उपचारांचे पुण्यातील एकमेव रुग्णालय म्हणजे डॉ. नायडू. या रुग्णालयाच्या जागेवर नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया रचला जाणार आहे. त्यामुळे डॉ. नायडू रुग्णालयाची 120 वर्षांपासून पुण्याची असलेली "साथ' सुटणार असल्याचे स्पष्ट झाले.

डॉ. नायडू रुग्णालयाने स्वातंत्र्यपूर्व काळातील पाच आणि त्यानंतरची सात दशकं पुण्याची रुग्णसेवा केली. लोकांची नकारात्मक दृष्टी आणि राज्यकर्त्यांनी दिलेली पोरकेपणाची वागणूक रूग्णालयाच्या वाट्याला आली. "नायडू'चा इतिहास आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आता पुण्यात सुरू झाली आहे. कारण, या जागी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पिढीसाठी डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय ही ओळख राहील का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसर्गजन्य रुग्णालयाची जन्मकथा
संसर्गजन्य रुग्णालयाला डॉ. नायडू यांचे नाव सुरवातीपासून दिलेलं नाही. या रुग्णालयाची सुरवातच मूलतः विलगीकरण कक्ष (क्वारंटाइन वॉर्ड) म्हणून झाली. रुग्णांना इतर लोकांपासून वेगळे करून ठेवण्याचं ठिकाण म्हणजे हे संसर्गजन्य रुग्णालय. "पुण्यात 1897 मध्ये प्लेगने हाहाकार मांडला होता. त्या वेळीच सांसर्गिक रोगाच्या इस्पितळाचा जन्म झाला. 1897 मध्ये हे इस्पितळ सुरू झालं,' असा उल्लेख महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या डॉ. मा. प. मंगुडकर लिखित पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथात आढळतो.

प्लेगचा उद्रेक अन्‌ नायडू रुग्णालय
पुण्यातील रास्ता पेठेत 19 डिसेंबर 1896 रोजी प्लेगचा पहिला रुग्ण आढळला. पाठोपाठ आठच दिवसांत कसब्यात प्लेगचा दुसरा बळी गेला. यासाथीने दोन महिन्यांतच उग्र रूप धारण केलं. त्या वेळचं पुणे हे पेठांचं होतं. 1896 ते 1950 या 54 वर्षांमध्ये अनेक रुग्णांचे प्राण प्लेगने घेतले. प्लेगच्या रुग्णांना इतरांपासून वेगळे करून ठेवण्यासाठी मुठा आणि मुळा नदीच्या संगमावर संसर्गजन्य रुग्णालय उभारण्यात आले.

पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास!

कोण होते डॉ. नायडू?
प्लेगच्या साथीचे नियंत्रण करण्यासाठी 1933 मध्ये प्लेग नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. डॉ. नायडू हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे नाव देण्यात आले. याच प्लेगच्या साथीत डॉ. नायडू यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पुण्यातील साथरोग तज्ज्ञांनी दिली. पण, त्यांची अधिकृत नोंद कुठेही मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT