New municipality to be located near Pune said Guardian Minister
New municipality to be located near Pune said Guardian Minister  
पुणे

पुण्याजवळ होणार नवी महापालिका; पालकमंत्र्याचे संकेत

सकाळवृत्तसेवा

मुंबई/ पुणे : शहराची वाढलेली हद्द, त्यातील लोकसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि त्यावरील प्रशासकीय नियंत्रण पाहता नवी महापालिका करण्याबाबत सकारात्मक पावले उचलू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. याबाबत निर्णय घेताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराचा पूर्व भाग म्हणजे येरवडा, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, हवेली तालुक्‍यातील वाघोलीसह नव्या काही गावांसाठी हडपसरमध्ये स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी आहे. त्यावर गेली काही वर्षे फक्त चर्चा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दृष्टीने जुन्या-नव्या सरकारने पावले उचललेली नाहीत.

नोकरी गेल्यामुळं तरुणावर आली चोरीची वेळ; पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुणे महापालिकेच्या हद्दीतील काही भागांसह नव्या गावांतील पायाभूत सुविधांकडे आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप यांनी लक्ष वेधले होते. त्यावर पवार म्हणाले, "वाघोलीसह सर्व भागांना पाणी, रस्ते, आरोग्य या गरजेच्या सुविधा पुरविल्याच पाहिजेत. मात्र, या भागांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी आहे. त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु, त्याआधी सगळ्यांशी चर्चा केली जाईल.'

देशातच फिरताय ना? मग कोरोनाचं टेन्शन नको!

"ग्रामपंचायतीनुसार करआकारणी करावी'
महापालिकेतील नव्या गावांसह जुन्या गावांतील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, असे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नव्या अकरा गावांत कामे करण्यात महापालिकेला अपयश आले असून, त्यामुळे या गावांतील मिळकतींना महापालिकेऐवजी ग्रामपंचायतीच्या दरानुसार करआकारणी करावी, असा आग्रह आमदार संजय जगताप यांनी धरला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT