New NCP Office Pune
New NCP Office Pune Sakal
पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात लाभलं नवं भव्य मुख्यालय

सकाळ वृत्तसेवा

आजचा दिवस हा पुणे शहर (Pune City) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दृष्टीने ऐतिहासिक असा दिवस आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा १९ जून २०२१ ही तारीख नक्कीच सुवर्णाक्षरांत लिहिली जाईल. याचं कारणही तितकंच खास आहे. पुण्यातील टिळक रोडवरच्या गिरे बंगल्यातून डेंगळे पुलाजवळील भव्य इमारतीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय (NCP Office) स्थलांतरित होत आहे. आजपर्यंत २०० स्क्वेअर फुटाच्या गिरे बंगल्यातून चालणारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार यापुढे ६,००० स्क्वेअर फुटांच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयातून चालणार आहे. (New NCP Office in Pune)

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजवरच्या प्रवासात पुण्यातील गिरे कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी गिरे कुटुंबीयांनी टिळक रोडवरील आपला टुमदार बंगला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासाठी दिला. एवढेच नाही तर गेल्या १८ वर्षांपासून गिरे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जागेचे भाडे किंवा लाईटबील यासाठी एक रुपयाही आकारलेला नाही. स्थावर मालमत्तांचे दर गगनाला भिडत असताना पुण्यातील 'प्राईम लोकेशन'ला असलेली आपली मालमत्ता तब्बल १८ वर्षे विनामोबदला वापरण्यास देणे यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी गिरे कुटुंबियांच्या मनात असलेली प्रेमभावना दिसून येते.

या गिरे बंगल्यातील कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बरीच लांबपर्यंत मजल मारली आहे. याच कार्यालयातून पक्षाने शहरावर आपली पकड मजबूत केली. याच इमारतीतून अनेकदा पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा रोवला गेला. येथूनच पुणे शहराच्या प्रगतीचा आलेख रचला गेला. परंतू, बदलत्या काळानुसार या कार्यालयातील जागा अपुरी पडू लागली अनेक आधुनिक सुविधांची गरज भरायला लागली. यादरम्यान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हाती आली. शहराची सूत्रे हाती घेताच त्यांनी अक्षरशः संपूर्ण शहर अनेकदा पिंजून काढले. प्रोटोकॉलला केराची टोपली दाखवत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी थेट संवाद सुरू केला. अवघ्या काही दिवसांतच प्रशांत जगताप यांनी संपूर्ण शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरामोहरा बदलण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली. याच मोहिमेचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे नवीन 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय'.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे 'सर्वोत्तम दर्जा' हीच ओळख कायम ठेवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या कार्यालयाच्या प्रत्येक बारीकसारीक कामात स्वतः जातीने लक्ष दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांतून अवघ्या १७ दिवसांत भव्य असे 'राष्ट्रवादी काँग्रेस भवन' उभे राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT