पुणे : दुचाकीचे वाढते अपघात व त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या मृत्युच्या घटना लक्षात घेऊन केंद्र सरकारने दुचाकी प्रवासासाठी नुकतीच नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार दुचाकीला पायदान, हॅन्डहोल्ड व हलका कंटेनर सारखे सुटे भाग बसविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
- कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!
भरधाव दुचाकीच्या चाकात साडी अडकुन झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यु होतो, तर कधी दुचाकीला आवश्यक असणाऱ्या हॅन्डहोल्ड सारखे सुटे भाग न लावल्यामुळे दुचाकीवरुन तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशा अनेक छोट्या-छोट्या घटनांची केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी दुचाकीस्वार व त्यांच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी नवे नियम केले आहेत.
''अनेक दुचाकीमध्ये दुचाकीस्वार व पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुटे भाग बसविलेले नसल्याची सद्यस्थिती आहे. यावर रस्ते व महामार्ग मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले आहे.तसेच संबंधित नियमात वेळोवेळी बदल करण्यात येतील'', असेही रस्ते व महामार्ग मंत्रालयाने नमुद केले आहे.
अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन!
असे आहेत दुचाकीसाठीचे नवे नियम
- दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी हैण्ड होल्ड बसवावा
- पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूला पाय ठेवण्यासाठी पायदान बसवावेत
- दुचाकीच्या पाठीमागील टायरचा डावा भाग पूर्णपणे सुरक्षितरीत्या झाकलेला असावा. त्यामुळे पाठीमागील व्यक्तीचे कपडे अडकणार नाहीत.
- दुचाकीस्वाराच्या मागे किंवा पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीच्या मागे हलका कंटेनर बसवावा. (कंटेनरची लांबी - 550 मिमी, रुंदी 510 मिमी व उंची 500 मिमी अधिक नसेल)
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(edited by : sharayu kakade)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.