cybercrime
cybercrime 
पुणे

हॅकरकडून मुलांचे ऑनलाइन शोषण; सायबर गुन्हेगारांचे नवे टार्गेट

पांडुरंग सरोदे - सकाळ वृत्तसेवा

पुणे - केदार (नाव बदलले आहे) दररोज ‘ऑनलाइन क्‍लास’मध्ये सहभाग घेत होता. एक दिवस त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला, त्या मेसेजला त्याने प्रतिसाद दिल्यानंतर त्याला त्याच्या ओळखीचे मित्र असल्याचे हॅकरने भासविले. त्यानंतर केदारशी दररोज चॅटिंग करून त्याची वैयक्तीक माहिती काढून घेतली. त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे केदारला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. हा प्रकार त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावधगिरी बाळगल्याने पुढचा अनर्थ टळला. अशा पद्धतीने सध्या वेगवेगळ्या कारणांनी मोबाईल, इंटरनेटशी जोडल्या जाणाऱ्या किशोरवयीन मुलांना ‘लक्ष्य’ करण्याचे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन सायबर व महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. 

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून देशभरात ऑनलाइन शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. किशोरवयीन मुलांच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅब यासारखी साधने सहज पडू लागली आहेत. विशेषतः किशोरवयीन मुलांकडून इंटरनेटवरील फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, वुईचॅट, टेलिग्राम, स्नॅपचॅट, ई मेल, लिंक, इन्स्टंट मेसेज, विविध प्रकारचे गेम यांसारख्या विविध माध्यमांचा सहजपणे वापर केला जातो. मुलांचा ऑनलाइन पाठलाग करून सायबर गुन्हेगार त्यांना गाठतात. 

बनावट प्रोफाइल बनवून, मेसेज पाठवून किंवा ग्रुप तयार करून त्यांना आपल्याकडे आकर्षित करतात. संबंधित मुलांना त्याचे मित्र, नातेवाईक असल्याचे भासवून प्रारंभी त्यांची चेष्टा केली जाते. त्यानंतर त्यांना त्याचे फोटो, व्हिडिओ पाठवून देण्यास भाग पाडून नंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते. 

मुलांनी पाठविलेल्याच फोटो, व्हिडिओ कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी देत त्यांचे शोषण करण्यास सुरुवात केली जाते. विशेषतः अनेकदा मुलांकडील मोबाईलवर लिंक पाठवून त्याद्वारे मोबाईलचा ‘रिमोट ॲक्सेस प्राप्त करूनही मुलांचे शोषण केले जाते. 

नागरिकांना सजग रहावे
किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन शोषणाच्या या प्रकाराबाबत सायबर पोलिस व महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटरद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग, युट्यूब, झूम, लाइव्ह व्हॉटस्‌अॅप चॅटद्वारे मुलांना उत्तेजित करणे, जवळच्या व्यक्ती असल्याचे भासवून मुलांना जाळ्यात ओढणे अशा वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करून सायबर गुन्हेगारांकडून मुलांचे शोषण करतात. त्यामुळे नागरीकांनी सजग राहून काळजी घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र पोलिस व महा-सायबर पोलिसांनी आपल्या ट्विटरवर त्याबाबतचे पत्रक प्रसिद्धामध्ये दिली आहे. 

अशी घ्या काळजी 
मुले अस्वस्थ, नाराज, आक्रमक तर झाले नाहीत ना याकडे लक्ष देणे 
मुले सतत ऑनलाइन कोणाशी संपर्कात आहेत, हे पाहणे 
मुलांना समजून घेत त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा 
मोबाईलमधील ‘पॅरेंटस्‌ कंट्रोल’ हा पर्याय सक्रिय करा 
मोबाईलमध्ये चांगल्या दर्जाचा ऍन्टीव्हायरसचा टाका 

सध्या ऑनलाइन शिक्षणामुळे किशोरवयीन मुलांच्या हातामध्ये मोबाईल, टॅप, लॅपटॉप सहजपणे दिसतो. अशा मुलांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करतात. मोबाईलवर मेसेज, लिंक पाठवून मुलांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ, फोटो वापरून सायबर गुन्हेगार त्यांना धमकी देत मानसिक त्रास देतात. त्यामुळे पालकांनी मुलांना समजून घेत त्यांच्याशी संवाद वाढविला पाहिजे. तरच मुले सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणार नाहीत.
- ॲड. जयश्री नांगरे, सायबर तज्ज्ञ 

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना मोबाईल देण्याशिवाय पर्याय नाही. मुलांच्या हातामध्ये मोबाईल असताना ऑनलाइन क्‍लाससाठी त्याचा वापर करतात, की अन्य काही करतात, याकडे कामामुळे लक्ष देणे शक्‍य होत नाही. तरीही मुलांना चांगल्या-वाईट गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
- वंदना ठोसर, पालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT