New treatment on Coronavirus available at Symbiosis Hospital
New treatment on Coronavirus available at Symbiosis Hospital 
पुणे

सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता कोरोनावर उपचार !

सकाळवृत्तसेवा

पुणे :'कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.


पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची यंत्रणा कमी पडल्यानंतर सिम्बॉयोसिस रुग्णालयात कोरोनाबाधितांना भर्ती केले जाणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर कडक देखरेख 

या संदर्भात बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, 'शहरात कोरोनाबाधितांची संख्या सद्यस्थितीत नियंत्रणात असली तरी भविष्यातील धोके आणि इतर देशात आलेले अनुभव लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे. या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून केला जाणार आहे. शिवाय जे रुग्ण या योजनेला पात्र झाले नाही तर महापालिका संबंधित रुग्णाचा खर्च सीजीएचएस दराप्रमाणे अदा करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT