नीलेश शेलार ठरला 'इंदापूर श्री' चा मानकरी Sakal
पुणे

हनुमान व्यायामशाळेचा नीलेश शेलार ठरला 'इंदापूर श्री' चा मानकरी

वडापूरी येथील हनुमान व्यायाम शाळेचा निलेश शेलार हा प्रथम पुरस्काराच्या "इंदापूर श्री" चा मानकरी ठरला.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : एबीएस ग्रुप व जिम च्या वतीने इंदापूर तालुकास्तरीय २०२२ च्या शहा सांस्कृतिक भवन मध्ये पार पडलेल्या इंदापूर तालुकास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तालुक्यातील वडापूरी येथील हनुमान व्यायाम शाळेचा निलेश शेलार हा प्रथम पुरस्काराच्या "इंदापूर श्री" चा मानकरी ठरला. तर एबीएस जिमचा निलेश ढावरे हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेमध्ये "अपकमिंग बॉडी बिल्डर बॉडी "हा पुरस्कार एबीएस फिटनेसच्या अरबाज शेख तर बेस्ट म्युझिक पोझर पुरस्कार निलेश ढावरे याला देण्यात आला.स्पर्धेत ४७ स्पर्धक सहभागी झाले होते.

प्रथम पुरस्काराचा मानकरी निलेश शेलार यास रोख सात हजार रुपये, विजेता ट्रॉफी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारीसाखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.द्वितीय विजेता निलेश ढावरे याचा सन्मान रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह देवून ॲड. राहुल मखरे, नेहाल पठाण ,अशपाक इनामदार व गणेश भानवसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचे तिसरा क्रमांक व्ही फिटनेस क्लबचे दशरथ पाटोळे, चौथा क्रमांक गॅलेक्सी जिमचा मंगेश भंडलकर, पाचवा क्रमांक एबीएस जिम चे अरबाज पठाण, सहावा क्रमांक अभिषेक लोंढे, सातवा क्रमांक बशारत बागवान, आठवा क्रमांक महम्मद सैफ काझी, नववा क्रमांक नवनाथ मोरे व दहावा क्रमांक राहुल मेहेर (हनुमान व्यायाम शाळा) यांनी पटकावला. त्यांना बक्षीस वितरण भाजप भाजप शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, सुफी जमादार, वस्ताद पिंटू काळे, मोहसिन बागवान, समीर इनामदार, सतीश पांढरे, बाबाजान शेख, प्रशांत उंबरे, बबलू पठाण,रमेश शिंदे, आरशद सय्यद, ॲड. किरण लोंढे, वसीम बागवान, जाकिर काझी, तनवीर तांबोळी,महेश मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत पंच म्हणून बीबीपीएसचे दिलीप धुमाळ,मयुर मिहिर,ॲड. बाळकृष्ण नेहरकर,नचिकेत हरपळे,नेहा धुमाळ, आरती माळवाड यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप तर आभार प्रदर्शन एबीएस ग्रुपचे संस्थापक मोहसिन शेख व मेहराज शेख यांनी केले. निहाल पठाण व अशपाक इनामदार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT