Rajwardhan-Patil
Rajwardhan-Patil 
पुणे

‘नीरा भीमा’ची निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर - नीरा भीमा साखर कारखान्याच्या सन २०२० ते २०२५ च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या २२ उमेदवारांनी २३ उमेदवारी अर्ज भरले. 

ही निवडणूक बिनविरोध होण्याची केवळ औपचारिकता राहिली आहे.
गटनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार
उत्पादक गट - हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील, प्रतापराव पाटील, उदयसिंह पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, मच्छिंद्र वीर, दत्तात्रेय शिर्के, लालासाहेब पवार, कृष्णाजी यादव, बबनराव देवकर, भागवत गोरे, दत्तू सवासे. उत्पादक सहकारी संस्था/ बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था - हर्षवर्धन पाटील व उदयसिंह पाटील. अनुसूचित जाती जमाती - सुजाता गायकवाड. अनुसूचित जाती जमाती - चंद्रकांत भोसले. महिला - संगीता पोळ व जबीन जमादार. इतर मागासवर्गीय - कांतिलाल झगडे. भटक्‍या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग - विलास वाघमोडे.

हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीवही रिंगणात
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांनी नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय प्रवेश केला. 

नीरा-भीमा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यात राजवर्धन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज हे हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनलचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे राजवर्धन यांचा राजकारणातील प्रवेश बिनविरोध निवडीने होईल. ते उच्चशिक्षित असून, त्यांनी लंडन येथून पदवी घेतलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT