No corona report teacher No guarantee parents and students are still waiting to start School 
पुणे

शिक्षकांची तपासणी नाही, पालकांचे हमीपत्र नाही; विद्यार्थी खोळंबले शाळेच्या दारातच

सकाळवृत्तसेवा

पुणे  : पुण्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात अद्यापही अनिश्चितता दिसत आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर शहरातील सर्वच शाळांमधील घंटा सोमवारी (ता.4) वाजेल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. त्यातच मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून हमीपत्र भरून देण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. शाळा सुरु होणार या आशेने आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जावे लागणार आहे.

पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!​

राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची मान्यता दिली आहे. राज्यभरातील शाळा सुरू झाल्या, पण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी दोन वेळा शाळा सुरू करण्याचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला. मात्र, तिसऱ्या वेळेस महापालिका प्रशासन 4 जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू करण्यावर ठाम राहिले आहे. मात्र, शिक्षकांचा कोरोना चाचणीचा अहवालही शिक्षण विभागाला सादर न झाल्याने अनेक शाळांचे टाळे कायम राहणार आहे. त्यामुळं शाळेची घंटा वाजणार का, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

'आज शाळा सुरू होईल' या आशेने मुलं शाळेत आलेत पण, त्यांना पुन्हा घरी जावं लागणार आहे, कारण शिक्षकांनी स्पष्ट आदेश दिले नाहीत, पालकांनी संमती पत्र दिले नाहीत, त्यामुळे शाळा सुरू होणार नाही अस चित्र दिसत आहे.

पधारो म्हारे देस; उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमण​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT