no entry of corona 229 villages in Pune district  
पुणे

पुणे जिल्ह्यातील २२९ गावांत कोरोनाला No Entry

सकाळवृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्यातील २२७ ग्रामपंचायतींनी गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत केवळ गावातच नव्हे तर गावच्या वेशीवरसुद्धा कोरोनाला एन्ट्री करू दिली नाही. यामुळे या गावांना कोरोना कशाला म्हणतात, हेही माहीत नाही. पुणे जिल्ह्यातील १६.२९ टक्के ग्रामपंचायती या प्रथमपासूनच कोरोनापासून कायम दूर असल्याचे उघड झाले आहे. उर्वरित ८३.७१ टक्के ग्रामपंचायतींमध्ये मात्र एकदा का होईना कोरोनाने शिरकाव केला आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ४०८ ग्रामपंचायती आहेत. यापैकी आतापर्यंत १ हजार १७९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात कोरोना रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून न आलेल्या प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये दौंड तालुक्यातील नंदादेवी, कौठडी, खेड तालुक्यातील वरुडे, वासोली, वाडा (सुपेवाडी), वडगाव पाटोळे, वाफगाव, वाघू, वाकी खुर्द, वाशेरे, वेताळे येलवाडी, पुरंदर तालुक्यातील पोंढे, काळदरी, बहिरवाडी, पोखर, चिव्हेवाडी, मिसाळवाडी, हवेली तालुक्यातील प्रयागधाम, जांभळी, आंबेगाव तालुक्यातील ठाकरवाडी, राजपूर, कोलतावडे, फलोदे, राजेवाडी, पिंपरगणे आदींचा समावेश आहे.

हे वाचा - पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिला रुग्ण मांजरी बुद्रुक येथे सापडला होता. त्यानंतर ग्रामीण भागात हवेली आणि वेल्हे तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडू लागले होते. आजही जिल्ह्यातील कोरोनाच्या टॉप टेन हॉटस्पॉटमध्ये पुणे शहरालगतच्या सात गावांचा समावेश आहे.

कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अ‍ॅम्ब्युलन्स


ग्रामीण भागातील कोरोनाची सद्यःस्थिती
- जिल्ह्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या --- ४५ लाख
- एकूण ग्रामपंचायती --- १ हजार ४०८
- कोरोना संसर्ग झालेल्या ग्रामपंचायती --- १ हजार १७९
- आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायती --- २२९.
- वर्षभरात आढळून आलेले एकूण कोरोना रुग्ण --- १ लाख ४ हजार ५९४.
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण --- ९१ हजार ६३३
- कोरोनाने झालेले मृत्यू --- १ हजार ७६६.
- सध्या सक्रिय कोरोना रुग्ण --- ११ हजार १९५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT