DS-Kulkarni 
पुणे

हातात पैसा नाही, खायचं काय?; डीएसकेंच्या गुंतवणूकदारांचा प्रश्‍न

सकाळवृत्तसेवा

पुणे - आम्हाला आता आमच्या दैनंदिन गरजाही भागविणे अवघड झाले आहे. हातात पैसा नसल्याने खायचे काय, हा प्रश्‍न आहे डीएसकेंकडे गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचा. लॉकडाउनमुळे डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव रखडला आहे. परिणामी आपल्या हक्काच्या पैशांपासून या ज्येष्ठ मंडळींना वंचित राहावे लागत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या विविध कंपन्यांच्या मालकीच्या मालमत्तेचा लिलाव होऊन आपले पैसे मिळतील, अशी आस असणाऱ्या ठेवीदारांची लॉकडाउनमुळे निराशा झाली आहे.

सक्तवसुली संचालनालय (इडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश न्यायालयाने २० जानेवारी रोजी दिला आहे.  हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

आधी बॅंकांना मग ठेवीदारांना पैसे
संपत्तीची विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले पैसे पहिल्यांदा डीएसके यांनी ज्या बॅंकांतून कर्ज घेतले, त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेले पैसे ठेवीदारांना देण्यात येतील. पुणे, वणी आणि लोणावळ्यासह राज्यभरात डीएसके यांची संपत्ती आहे. त्यांचा विक्रीतून सुमारे दीड हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात, असा सरकार पक्षाचा अंदाज आहे.
    
वाहनांच्या लिलावातून ३९ लाख रुपये
डीएसके यांच्या सहा वाहनांची फेब्रुवारी महिन्यात जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात आली आहे. यातून ३९ लाख ४५ हजार रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम व डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीने वाटता येईल, याचा आराखडा तयार करून न्यायालयात सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.

४६३ - जप्त मालमत्ता
९३ - लिलावावर हरकती
३९,४५००० - वाहनांच्या लिलावातून जमा रक्कम
६ कोटी ६५ लाख - न्यायालयात जमा केलेली रक्कम

शिरीष कुलकर्णी आणि डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या संपत्ती लिलावातून वगळण्याची विनंती केली आहे.  १४ संपत्तीबाबत आम्ही हरकत नोंदवली आहे. 
- ॲड. आशिष पाटणकर, बचाव पक्षाचे वकील

चांगला परतावा मिळत असल्याने मी १३ लाख रुपये डीएसकेंकडे गुंतवले. माझी मुदत संपण्याच्या तीन महिने आधी हा प्रकार घडला.  
-एक ठेवीदार

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

"ते जुने गाऊन मी सिनेमात वापरले" भार्गवीने सांगितला वन रूम किचन सिनेमाचा खास किस्सा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग; बाजूच्या दुकानांनाही फटका

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

SCROLL FOR NEXT