Gaja marne sakal
पुणे

Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांचा दणका! वाई येथून घेतलं ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

पुणे: कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्महाऊसवर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गजानन मारणे यांच्यावर खंडणी, अपहरण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ॲड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आला असताना पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलीस गजानन मारणेला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत.

शेअर दलाल व व्यावसायिक व्यक्तीचे २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करण्याच्या प्रकरणी गज्या उर्फ गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत आदेश दिले होते.

गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली,पलूस, सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्यात आली.

भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 4 जणांना अटक केली होती. त्यांनतर गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले होते. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT